दह्याला पाणी सुटतंय? ते घट्ट होत नाही? उपाय आहे..
X
उन्हाळ्यात लोक जास्त दही खातात. पण, दह्याची सर्वात मोठी समस्या म्हणजे एकतर त्यात पाणी सुटते किंवा ते आंबट होते. असे होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे एकतर दूध नीट उकळलेले नाही किंवा गोठल्यानंतर ते व्यवस्थित साठवले गेले नाही.
दही नीट बसत नसल्याने पाणी सोडते. याशिवाय आंबट दही खाल्ल्याने शरीरात गॅस्ट्रिकचा त्रास होऊ शकतो. याशिवाय पित्ताचे आजारही वाढवतात. त्यामुळे अॅसिडिटी आणि अल्सरची समस्या आधीच असेल तर आंबट दही खाऊ नये. दही आंबट होऊ नये म्हणून, दही सेट करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे.
फ्रिजमध्ये ठेवलेल्या इतर गोष्टींचा वास दही शोषून घेते
उन्हाळ्यात दही ठेवण्यासाठी उत्तम ठिकाण म्हणजे रेफ्रिजरेटर. मात्र, काही वेळा फ्रिजमध्ये ठेवल्यानंतरही दही आंबट होते. कारण दही इतर गोष्टींचा वास फार लवकर शोषून घेते. म्हणूनच फ्रिजमध्ये दही चांगले झाकून ठेवा. याशिवाय, फ्रिजच्या मागील बाजूस ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ते पुरेसे थंड होईल.
दुधाचे तापमान योग्य नसल्यास दही पाणी सोडते
जर दूध योग्य प्रकारे उकळले नाही आणि दही सेट करण्यासाठी योग्य तापमानात ठेवले तर दही व्यवस्थित सेट होत नाही आणि पाणी देखील सोडते. दही चांगले घट्ट होण्यासाठी दूध चांगले उकळले पाहिजे. घट्ट व चांगल्या दह्यासाठी दूध जास्त गरम किंवा थंड नसावे. कधी कधी दूध गरम असताना त्यात दही घातल्यानंतरही ते नीट लागत नाही.