Home > News > गरोदर आणि स्तनदा मातांनी कोरोना संकटात काय काळजी घ्यावी

गरोदर आणि स्तनदा मातांनी कोरोना संकटात काय काळजी घ्यावी

गरोदर आणि स्तनदा मातांनी कोरोना संकटात काय काळजी घ्यावी
X

मुंबई: कोरोना संकटात काय काळजी घ्यावी असा प्रश्न गरोदर आणि स्तनदा मातांना नक्कीच पडत असेल (What pregnant and lactating mothers should take care of in corona crisis), त्यामुळे अशा काळात बाळाची आणि आपली काळजी कशी घ्यावी या विषयी आज आम्ही तुम्हाला सागणार आहोत, तर पाहू यात नक्की काय काळजी घ्याल...

बाळाला योग्य पूरक आहार न मिळाल्यास त्याला काही आजार होऊ शकतो का?




योग्य पूरक आहार न मिळाल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ति कमी होते त्यामुळे त्याला कुठलेही आजार होऊ शकतात. न्यूमोनिया, मलेरिया, अतिसार इत्यादी. आणि कधी कधी कुपोषण इतके तीव्र होते की ते बाळाच्या जीवावर बेतू शकते.

बाळासाठी दुसरी स्तनपानबाबत शिफारस काय आहे?




पहिले ६ महिने फक्त मातेचे दूधच देण्यात यावे. मातेच्या दुधाशिवाय त्याला दुसरे काही देण्याची गरज नाही. या ६ महिन्यात बाळाला पाणी, मध किंवा दुसरे कोणतेही चाटण देऊ नये. मातेचे दूध सोडून कुठलेही बाह्य खाद्यपदार्थ बाळाच्या शारीरिक आणि मानसिक विकासात उपयोगी ठरत नाहीत.

आईने आजारपणात बाळास स्तनपान कसे करावे?



शक्य असेल त्याप्रकारे स्तनपान करण्यासाठी आईला प्रोत्साहन द्यावे. शक्य नसल्यास स्तनातून दूध काढून वडिल किंवा कुटुंबातील कोणीही सदस्य बाळाला सतत देऊ शकत.

माता संक्रमित असतानाही बाळाला स्तनपान का करावे?



आईकडून मिळणाऱ्या दुधामध्ये सर्वाधिक प्रतिकार शक्ती असते. त्यामुळे बाळाचे संसर्गापासून रक्षण होते. त्यामुळे माता स्वतः संक्रमित असेल तरी बाळाला नियमित स्तनपान करावे. बाळाला संसर्ग होऊ नये म्हणून आईने सर्व प्रकारची काळजी घेतली पाहिजे.

गरोदार मातांसाठी कोरोनाबाबत काही वेगळ्या सूचना आहेत का?





सर्वांना ज्या सुचना लागू आहे त्याप्रमाणे गरोदर मातेने देखील आपले हात वारंवार साबणाने धुवावे आणि गरज नसताना बाहेर जायचे टाळा. वारंवार सॅनिटायझरने हात स्वच्छ करावे. महत्त्वाचे म्हणजे पोषण आहार व्यवस्थित घ्यावा.

Updated : 1 July 2021 12:55 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top