Home > News > नवलच! आता थेट अंतराळातही करता येणार विवाह सोहळा; आताच 2024 पर्यंतची बुकिंग फुल

नवलच! आता थेट अंतराळातही करता येणार विवाह सोहळा; आताच 2024 पर्यंतची बुकिंग फुल

नवलच! आता थेट अंतराळातही करता येणार विवाह सोहळा; आताच 2024 पर्यंतची बुकिंग फुल
X

आपलं लग्न समारंभ जरा हटके व्हावा, लोकांच्या लक्षात राहावे यासाठी अनेक जण वेगवेगळी शक्कल लढवतात. कुणी पाण्यात, कुणी बसमध्ये तर कुणी विमानात लग्न लावल्याचे आपण पहिले. पण आता तर फक्त पृथ्वीवरच नाही तर तुम्हाला अवकाशातही लग्न (Wedding in Space) करता येणार आहे. आयकून विश्वास बसत नसला तरीही हे शक्य आहे.

जमिनीपासून एक लाख फूट (19 मैल) उंचीवर म्हणजे पृथ्वीशी कोणताही संबधनसलेल्या ठिकाणी तुम्हाला विवाह सोहळा करता येणार आहे. फ्लोरिडामधील स्पेस पर्स्पेक्टिव्ह ही कंपनी अंतराळात लग्न करण्याची सुविधा देणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. फुटबॉल स्टेडियमच्या आकाराचं एक स्पेस कॅप्सूल अवकाशात सोडणार आहे. ज्यात तुम्हाला आपला लग्न समारंभ पार पाडता येईल. सध्या ही कंपनी या साठी एक लाख 25 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे एक कोटी रुपये तिकीट आकारत आहे.

पण म्हणतात ना हौसेला मोल नसतो, त्याप्रमाणे इथही लोकं अफाट पैसे देऊन थेट अंतराळातही विवाह सोहळा लावण्यासाठी तयार आहेत. आताच 2024 साठी सर्व कॅप्सुल बुक झाली आहेत. पण 2025 साठी अजूनही बुकिंग सुरू असल्याचंही कंपनीने स्पष्ट केलं आहे.

Updated : 28 July 2021 11:17 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top