Home > News > शॉर्ट स्कर्ट घालणे, उत्तेजक नृत्य करणे हे अश्लील कृत्य नाही : उच्च न्यायालय

शॉर्ट स्कर्ट घालणे, उत्तेजक नृत्य करणे हे अश्लील कृत्य नाही : उच्च न्यायालय

शॉर्ट स्कर्ट घालणे, उत्तेजक नृत्य करणे हे अश्लील कृत्य नाही : उच्च न्यायालय
X

गौतमी पाटीलच्या नृत्यावरून तिला अनेकांनी ट्रोल केलं. काहींनी तिच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी देखील केली होती. कारण अश्लील हावभाव करत तिचं नाचनं हे अनेकांना उत्तेजक, अश्लील वाटतं होतं. त्यामुळं तिच्या नृत्याला विरोध केला गेला. मात्र, आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं यासंदर्भातच एक महत्त्वाची टिप्पणी केलीय.

नागपूरच्या खंडपीठानं छोटे कपडे घालून नृत्य करणं आणि नृत्य करतांना त्यांच्या नकली नोटा उधळण्याच्या गुन्ह्यातील पाच जणांविरोधात नोंदविण्यात आलेला एफआयआर रद्द करतांना ही टिप्पणी केलीय. न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्यायमूर्ती वाल्मिकी सा मेनेजेस च्या खंडपीठानं ही टिप्पणी केलीय. खंडपीठानं म्हटलं की, सध्याच्या भारतीय समाजात प्रचलित असलेल्या नैतिकतेला मानदंड मानतो. मात्र, आता महिलांनी स्वीमिंग सूट किंवा दर्शनी कपडे घालणं सामान्य आणि स्वीकृत झालंय.

न्यायालयानं पुढं म्हटलंय की, तक्रार/एफआयआर मध्ये स्कर्ट घालणं, उत्तेजक नृत्य करणं अशा गोष्टींना पोलीस अधिकारी अश्लील समजतात. मात्र, अशा नृत्याला अश्लील म्हणता येणार नाही, जे नृत्य समाजातील कुठल्याही नागरिकाला त्रासदायक ठरेल. एखादा पोलीस अधिकाऱी अशा नृत्याला अश्लील समजू शकतो, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. मात्र, न्यायालय यासंदर्भात संकीर्ण दृष्टिकोनाचा विचार करत आहे. हा मुद्दा प्रगतीशील दृष्टिकोनाचा असल्यानं न्यायालय तो स्विकारत आहे. त्यामुळं अशाप्रकारचा निर्णय घेणं हे पोलीस अधिकाऱ्यांच्या हातात देणं योग्य नसल्याचंही न्यायालयानं म्हटलंय.

Updated : 15 Oct 2023 2:30 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top