आम्ही महिला आमदार सर्व महाराष्ट्राचे प्रश्न सोडवू आणि लोकशाही बळकट करू - रूपाली चाकणकर
X
नागपूर येथे सोमवार 16 डिसेंबर रोजी उपसभापती कार्यालय आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्यातर्फे महिला मंत्री आणि लोकप्रतिनिधी स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिलांवरील विविध विषय, महिलांचा सन्मान, महिलांची सुरक्षा, बालविवाह, हुंडाबळी, महिलांवरील अत्याचार या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सांगितले की, आपण महिला म्हणून सर्व महाराष्ट्राचे प्रश्न सोडवू आणि लोकशाही बळकट करू. या कार्यक्रमात विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.
यावेळी त्यांनी सर्व आमदार महिलांचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्या की, महिलांच्या प्रश्नासाठी राज्य महिला आयोगाने चौथ महिला धोरण केलं आहे. महिलांवर खूप मोठी जबाबदारी आहे की, आपल्या कडून कोणतेही गैरवर्तन होणार नाही, आणि या आमदार महिलांच्या सोबतीने आपण महिलांचे प्रश्न मांडू. या कार्यक्रमात भाजपच्या चित्रा वाघ, आदिती तटकरे, रूपाली चाकणकर, नीलम गोऱ्हे, नमिता मुंदडा, सना मलिक, स्नेहा दुबे, श्रिजया चव्हाण, मनीषा कायंदे, मंजुळा गावित या महिला आमदारांची उपस्थिती होती.