Home > News > अल्पवयीन मुलीला पळवणाऱ्या जोडप्याला पोलिसांनी कसे पकडले पहा...

अल्पवयीन मुलीला पळवणाऱ्या जोडप्याला पोलिसांनी कसे पकडले पहा...

X

अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या जोडीला खामगाव शिवाजी नगर पोलिसांनी मलकापूर येथून अटक केली. अल्पवयीन मुलीला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीनंतर तिच्या आई-वडिलांकडे तिला सोपवण्यात आले. शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील घाटपुरी येथील गजानन कॉलनीतून शुभम विठ्ठल शेलकर वय 35 आणि वैशाली कुंभरे उर्फ सपना समरथ साहु वय 30 या दोघांनी एका अल्पवयीन मुलीला 24 जुलै रोजी पळवून नेले होते. या प्रकरणी पिडीतेच्या वडीलांच्या तक्रारीवरून उपरोक्त दोघांविरोधात शिवाजी नगर पोलीसांनी कलम 363, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी वैशाली कुंभरे ऊर्फ सपना समरथ साहु व शुभम विठ्ठल शेलकर यांचा गोपनीय बातमीदार व तांत्रिक पुराव्याच्या आधारे शोध घेतला. दोन्ही आरोपींना नांदुरा व मलकापूर येथून अल्पवयीन मुलीसह ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करून तिला आई वडीलांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधिक्षक विवेक पाटील, पोलीस निरिक्षक अरूण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश घुगे व शैलद्रसिंह राजपुत, राजू कोल्हे, अमोल तरमळे यांनी केला आहे.

Updated : 28 July 2023 11:43 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top