दिवंगत सुषमा स्वराज यांचे संसदेतील आक्रमक भाषण
X
भाजप नेते अटलबिहारी वाजपेयी यांना पंतप्रधान झाल्यानंतर केवळ 13 दिवसांनी राजीनामा द्यावा लागला होता आणि त्यानंतर दिवंगत सुषमा स्वराज यांनी 11 जून 1996 च्या भाषणाने सभागृह हादरून टाकले होते. सुषमा स्वराज यांनी अटलबिहारी वाजपेयी यांची प्रभू राम आणि राजा युधिष्ठिर यांच्याशी तुलना केली होती व त्यानंतर संपूर्ण सभागृहात गदारोळ झाला होता यावेळी सभापतींनी मिश्किल पणे स्वराज यांना, "तुमचे भाषण इतके मनोरंजक बनवू नका. असं म्हंटल होतं.
त्यानंतर सुषमा स्वराज यांनी केलेल्या भाषणाने विरोधकांचा थरकाप उडाला होता. "आमचे विरोधक आमच्यावर जातीयवादी असल्याचा आरोप करतात, होय, आम्ही जातीयवादी आहोत कारण आम्ही राष्ट्रीय गीत वंदे मातरम गातो, आम्ही तिरंग्याच्या सन्मानासाठी लढतो, आम्ही संविधानातील कलम 370 रद्द करण्याची मागणी करतो, आम्ही समान नागरी संहिता लागू करण्याविषयी बोलतो, आम्ही जातीयवादी आहोत कारण आम्हाला हिंदू असण्याचा अभिमान वाटतो. असं म्हणत त्यांनी संपूर्ण सभागृह त्यांच्या वाणीने हादरून सोडलं होतं. दिवंगत सुषमा स्वराज यांचे हे आक्रमक भाषण नक्की पहा..