कार्यालयांमध्ये महिलांसाठी विशाखा समिती स्थापन करण्याचे आदेश
X
महिलांचा कामाच्या ठिकाणी अनेक वेळा मानसिक, शारीरिक तसेच लैंगिक छळ केला जातो .पण यावर उपाय म्हणून शासन काय योजना राबवतं ? हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो.त्याचा फायदा महिलांना होत आहे का? याचे उत्तर कित्येकदा मिळत नाही
पण महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात 313 शासकीय कार्यालयांपैकी 149 तर 6737 खाजगी कार्यालयांपैकी 69 कार्यालयांमध्ये विशाखा समिती स्थापन करण्यात आले आहे उर्वरित सर्वच कार्यालयाने आपल्या कार्यालयात ही समिती तात्काळ स्थापन करावी अशा सूचना बुलढाणा जिल्हा महिला बालविकास अधिकारी अशोक मारवाडी यांनी केले आहे.
सर्वच कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ टाळण्यासाठी अंतर्गत तक्रार निवारण समिती म्हणजेच विशाखा समिती स्थापन करणेअनिवार्य आहे .कार्यालयातील सहकाऱ्यांकडून महिलांवरील होणारे अत्याचार त्याचबरोबर लैंगिक शोषणाची तक्रार ऐकून निवाडा करण्यासाठी सर्वच शासकीय व खासगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती अर्थात विशाखा समिती स्थापन करणे कायद्यानुसार अनिवार्य करण्यात आले आहे. समिती स्थापन करण्याबाबत महिला व बालविकास विभागा मार्फत आदेश देण्यात आले आहेत, त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यात ३१३ शासकीय कार्यालयांपैकी १४९ तर ६७३७ खासगी कार्यालयांपैकी ६९ कार्यालयांमध्ये विशाखा समिती स्थापन करण्यात आली आहे