Home > News > टेस्ट क्रिकेटमध्ये 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विराट कोहलीने अनलॉक केला आपला लॅपटॉप

टेस्ट क्रिकेटमध्ये 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विराट कोहलीने अनलॉक केला आपला लॅपटॉप

टेस्ट क्रिकेटमध्ये 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विराट कोहलीने अनलॉक केला आपला लॅपटॉप
X

आजच्याच दिवशी 11 वर्षांपूर्वी 20 जून रोजी विराट कोहलीने टेस्ट क्रिकेट मध्ये आपला पहिला सामना खेळला होता. उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज विराट कोहलीने किंगस्टन, जमैका इथे वेस्टइंडीजच्या विरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये टेस्ट डेब्यू केला होता. आज या निमित्ताने 11 वर्षांनी, कोहलीने आपला लॅपटॉप अनलॉक करत एक कमालीचे खास फोल्‍डर सगळ्यांसाठी खुले केले. यात अनेक अनमोल आठवणी आहेत. विराटने अतिशय यशस्वीपणे कर्णधारपद भूषवले होते.

टेस्ट क्रिकेटमध्ये 11 वर्ष पूर्ण केल्यानंतर, कोहलीने सोमवारी कू वर एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. यात त्याने टेस्ट क्रिकेटमधील आपले अनेक सुरेख क्षण खुले केले आहेत.

https://www.kooapp.com/koo/virat.kohli/bd1df754-5ce4-4b41-821e-b3945c379584

33 वर्षीय विराटने आपल्या करियरमध्ये आजवर 101 टेस्ट खेळल्या आहेत. यात त्याने 49.95 च्या सरासरीने 8 हजार 043 धावा काढल्या आहेत. यात त्याचा सर्वोच्च स्कोर नाबाद 254 धावा हा राहिला आहे. विराट सध्या वाईट फॉर्मच्या काळातून जातो आहे. त्याने शेवटच्या वेळी बांग्लादेशविरुद्ध कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये डे-नाइट टेस्टमध्ये शतक बनवले होते.

विराटने यावर्षी जानेवारीत दक्षिण आफ्रिकेत 1-2 ने सीरीज हारल्यानंतर भारताचा टेस्ट कर्णधार या रुपात पद सोडले होते. विराट 68 सामन्यांमध्ये 40 विजय नावावर असलेला भारताचा सर्वात यशस्वी टेस्ट कर्णधार आहे. तो ग्रीम स्मिथ, एलन बॉर्डर, स्टीफन फ्लेमिंग, रिकी पॉटिंग आणि क्लाइव लॉयड नंतर टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातला सहावा सर्वात सफल कर्णधार आहे.

Updated : 21 Jun 2022 8:04 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top