गणेश नाईकांना चर्चेची दारं खुली, पिडीतेच्या वकिलांचा खुलासा
X
भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर दाखल बलात्कार गुन्ह्या प्रकरणी अटकपूर्व जामिनावर आज ठाणे सत्र न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. गणेश नाईक यांनी नाते आणि मुलगा असल्याचे मान्य केल्याने आम्ही अर्धी लढाई जिंकलो असल्याची प्रतिक्रिया तक्रारदार दीपा चौहान यांच्या वकिलांनी व्यक्त केलेय. जर गणेश नाईक सर्व मागण्या मान्य करत असतील तर नक्कीच आम्ही चर्चेला तयार असल्याचा खुलासा देखील यावेळी अडवोकॅटे लुसी मेस्सी यांनी केलाय. काल झालेल्या सुनावणी दरम्यान 27 वर्षाचे नाते त्यांनी मान्य केलंय सोबतच आपला मुलगा असल्याचे मान्य केलंय या बाजू समोर ठेवत गणेश नाईकांचे वकील अटकपूर्व जामीन मंजूर करावा यासाठी प्रयत्न करणार आहेत. तर दीपा चौहान यांच्या बाजूने अडवोकॅटे लुसी मेस्सी मांडणी करणार आहेत. यासंदर्भात अडवोकॅटे लुसी मेस्सी यांनी आपली प्रतिक्रिया दिली..
पक्ष बदलल्याने आरोप झाले?
परंतु आता दोन वर्षांपासून आपण राजकीय पक्ष बदलून भाजप मध्ये प्रवेश घेतल्यानेच आपल्यावर आरोप होत असल्याची तक्रार नाईक यांच्या वकिलांनी केली. बंदूक दाखवणे हा फार मोठा गुन्हा असून यावर्षी अंतरीम जामीन मिळू नये अशी मागणी फिर्यादी वकिलांनी केली आहे. सदर प्रकरणाची सुनावणी तपास अधिकारीच ऐकणार असून मगच अटकपूर्व जमिनावर सुनवाई २७ एप्रिलला करणार असल्याची माहिती फिर्यादी वकिलांनी दिली. या सर्व प्रकारामुळे गणेश नाईक यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम असून त्यांच्या डोकेदुखीत वाढच होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.
गणेश नाईक अज्ञातवासात?
धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचं प्रकरण सध्या गाजत असतानाच गणेश नाईक यांचे प्रकरण आता समोर आलं आहे. दिपा चौहान या महिलेने गणेश नाईकांनी पिस्तूल दाखवून धमकी दिली तसेच बलात्कार केला म्हणून त्यांच्यावर बेलापूर आणि नेरूळ येथील पोलिस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी नाईकांवर गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर त्या महिलेने महिला आयोगाकडे लेखी तक्रार केली. या प्रकरणात चौकशी झाल्यानंतर महिला आयोगाने नाईक यांच्या अटकेचे आदेश दिले. पोलीस गणेश नाईक यांच्या घरी, कार्यालयात आणि मुरबाड येथील फार्महाऊसवर अटकेसाठी पोहोचले पण गणेश नाईक कुठेच नाही आहेत. ते सध्या अज्ञातवासात आहेत.