"Cow hug day"या व्हॅलेंटाईनला मिठी कुणाला मारायची?
X
व्हॅलेंटाईन डे साठी या क्षणी अनेक तरुण काही प्लॅन करत आतील.., कोणी आपल्या भावना आपल्या आवडत्या व्यक्तीला व्यक्त करण्याचा विचार करत असेल तर कोणी आपल्या व्हॅलेंटाईन ला काही खास सरप्राइज देण्याच्या विचारात असेल..
एकीकडे तुम्ही या सगळ्या तयारीत असला तरी दुसरीकडे हा व्हॅलेंटाईन डे साजराच केला नाही पाहिजे असं म्हणणारे लोक देखील आहेत.. बाकी ठीक आहे ज्यांना साजरा करायचं ते करतील ज्यांना नाही ते करणार नाहीत. हा ज्याचा त्याचा विषय आहे. पण आता जो विषय आहे तो म्हणजे सरकारच एक परिपत्रक काढत ,व्हॅलेंटाईन डे नाही तर 'गाय आलिंगन दिवस' साजरा करण्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे .
'गाय आलिंगन दिवस' साजरा करा म्हणणारे परिपत्रक नक्की आहे काय?
भारतीय पशु कल्याण मंडळाने 14 फेब्रुवारी रोजी 'गाय आलिंगन दिवस' साजरा करण्याचे आवाहन केले आहे. 6 फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या अपील पत्रात मंडळाने लिहिले की, आपल्या सर्वांना माहित आहे की गाय हा भारतीय संस्कृती, आपले जीवन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. गाईला आपण कामधेनू आणि गौमाता म्हणतो तिच्या मातृत्वामुळे. पाश्चात्य संस्कृती आणि चकचकीतपणामुळे वैदिक परंपरा जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. गाईचे फायदे पाहून तिला मिठी मारल्याने आनंद मिळेल. भारतीय संस्कृतीचा प्रसार होईल आणि जीवनात सकारात्मकता येईल. सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेनंतर आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या सूचनांनंतरच हे जारी करण्यात आल्याचे अपील पत्राच्या शेवटी लिहिले आहे.
अॅनिमल वेलफेअर बोर्ड म्हणजे काय?
अॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया (AWBI) ही भारत सरकारची संस्था आहे. ज्याची स्थापना प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, 1960 (PCA कायदा) अंतर्गत करण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारला जनावरांचे कल्याण काय आहे, हे सांगते. तसेच, हे मंडळ PCA ACT आणि या कायद्यांतर्गत बनवलेल्या नियमांशी संबंधित बाबी हाताळते.
गाईला आलिंगन पण बैलाला का नाही ?
गाईला भारतीय संस्कृतीत श्रद्धास्थान म्हणून मानलं जातं . त्यामुळे गाईला आलिंगण मारण्याची प्रथा आता 14 फेब्रुवारीला या संस्थेने उपस्थित केली असली, तरी बैल हा शेतकऱ्याचा मित्र असतो ,बैलामुळे शेतकरी चांगलं पीक आपल्या शेतात घेतो आपल्यापेक्षा जास्त जीव बैलावर हे शेतकरी लावतात त्यामुळे गाईला आलिंगन पण बैलाला का नाही ? असा प्रश्न सुद्धा समाज माध्यमांवर विचारला जातो आहे .