15 ते 18 वर्षाच्या मुलांसाठी लसीकरणाला होणार सुरूवात; करावी लागणार नोंदणी...
X
कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी आरोग्य विभागाने जोरदार प्रयत्न सुरू केलेत. भारतात 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षाच्या मुलांसाठी लसीकरणाला सुरूवात करण्यात येणार आहे. मात्र, यासाठी नोंदणी करावी लागणार आहे. लसीकरणासाठीची नोंदणी प्रक्रिया आधीच्या नोंदणीसारखी असणार आहे.
पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित करताना 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची घोषणा केली. हे लसीकरण नव्या वर्षात 3 जानेवारीपासून सुरु होणार आहे. यामुळे शाळांमध्ये अखेरच्या वर्षात तसंच कनिष्ट महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
दरम्यान , हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्सना दोन लसीकरणानंतर बूस्टर डोसही देण्याची सुरुवात करण्यात येणार असल्याची दुसरी महत्वाची पंतप्रधान मोदींनी केली. याची सुरुवात 10 जानेवारी, 2021 पासून होणार आहे. त्यानंतर मोदींनी तिसरी महत्वाची घोषणा केली ती म्हणजे 60 वर्षांवरील सामान्य नागरिकांनाही डॉक्टरांच्या सल्ल्याने बूस्टर डोस देण्याची सुरुवात करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.
आतापर्यंत कोरोनावरील प्रतिबंधक लसीचे 141 कोटीहून अधिक डोस देण्यात आलेत. काल 29 लाख 93 हजार 283 डोस देण्यात आलेत. त्यामुळे आतापर्यंत देण्यात आलेल्या लसीच्या डोसचा आकडा 141 कोटी 70 लाख 25 हजार 654 वर पोहोचला आहे.