डोनाल्ड ट्रम्प क्वारंटाइन
X
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना टेस्ट करण्यात आली असून त्यांनी स्वत:ला क्वॉरंटाइन करून घेतले आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्रम्प यांनी ही माहिती दिली आहे. ट्रम्प यांची खासगी सल्लागार होप हिक्स यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर व्हाइट हाऊस हादरले आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिय ट्रम्प यांची देखील कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. दोघांचा रिपोर्ट अद्याप हाती आलेला नाही, मात्र खबरदारीचा उपाय म्हणून दोघांनी सध्या क्वारंटाइन राहण्याचा निर्णय घेतला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “अजिबात विश्रांती न घेता सतत काम करणाऱ्या होप हिक्सचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. धक्कादायक…फर्स्ट लेडी आणी मी आमच्या रिपोर्टची वाट पाहत आहोत. आम्ही क्वारंटाइनची प्रक्रिया सुरु केली आहे”.
https://twitter.com/realDonaldTrump/status/1311859538279239686
दरम्यान, जागतिक मीडियाचे लक्ष आता ट्रम्प दांपत्याच्या रिपोर्टकडे आहे.