अदाणी फाऊंडेशन आणि अदाणी इलेक्ट्रिसिटीकडून मुंबईत 'उत्थान' प्रकल्प...
X
१८ नोव्हेंबर, २०२१ : अदाणी समूहाची सामाजिक विकास शाखा असलेले अदाणी फाऊंडेशन व अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (एईएमएल) च्या सहकार्याने 'उत्थान' हा एक यशस्वी कार्यक्रम मुंबईत सुरू करण्यात आला आहे. 'उत्थान'चे उद्दिष्ट विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या क्षमतेला चालना देणे आणि त्या शिक्षणाचे परिणाम चांगले करणे, हा आहे. यामध्ये सरकारी प्राथमिक शाळा दत्तक घेणे, प्रिय अर्थात प्रगतीशील विद्यार्थ्यांना शिकवणे, गळतीचे प्रमाण रोखणे व कर्मचाऱ्यांच्या क्षमता वाढीसाठी सहकार्य करणे यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत शिक्षण आणि संख्यात्मक कौशल्ये वाढवण्यासाठी शिक्षक व पालकांना यांत सामावून घेतले जाणार आहे.
अदाणी फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्रिती अदाणी यांच्याहस्ते करण्यात आला यावेळी त्यांनी 'कार्यक्रमात संबोधित करताना अध्यक्ष म्हणाले, 'साथीच्या रोगाने विद्यार्थ्यांसाठी, विशेषत: समाजातील वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शिकण्याची पोकळी निर्माण केली आहे. आता शाळा लवकरच पुन्हा सुरू होतील, अशी आमची अपेक्षा आहे. अशा स्थितीत मुंबईत उत्थानचा शुभारंभ या महत्त्वपूर्ण टप्प्यावर आला आहे. या प्रकल्पाची रचना केवळ अभ्यासच नव्हे, तर इतर वैयक्तिक अडचणींनादेखील तोंड देणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वांगीण सहाय्याद्वारे शिक्षणातील अंतर भरून काढण्यासाठी करण्यात आली आहे. पालक, शिक्षक आणि सहकारी, प्रकल्पातील असे सर्व भागधारक विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी एकत्रितपणे काम करतील, तेव्हा हे शक्य होईल.' अस त्या म्हणाल्या.
यावेळी मुलांचे आरोग्य (इयत्ता पहिली ते आठवी), सामुदायिक एकत्रीकरण मार्गदर्शक तत्त्वे, इंग्रजी भाषा आणि गणित, या पुस्तकांचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. मुंबईतील 'उत्थान' प्रकल्पाचे भागीदार असलेले लर्निंग लिंक्स फाउंडेशन, यांनी तीन प्राधान्यक्रम सेट केले आहेत, अ) मुलांच्या आरोग्य-मानसिक कल्याणाकडे लक्ष देणे, ब) शारीरिक वर्गांच्या कमतरतेमुळे प्रभावित झालेला शिकण्याचा स्तर उंचावण्यासाठी त्यांना मदत करणे व क) मुलांना त्यांची शिकण्याची क्षमता आणि त्याचे परिणाम वाढविण्यात मदत करण्यासाठी शिक्षकांची क्षमता तयार करणे, यांचा त्यात समावेश आहे.
खालील घटकांसह चेंबूर, मुंबई येथील २५ महापालिका शाळांमध्ये हा प्रकल्प सुरू केला जाईल:
• निरोगीपणाच्या पद्धती, स्वच्छता, आणि सामाजिक-भावनिक विकास यासह सर्वांगीण विकास
• प्राथमिक/उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी मूलभूत साक्षरता आणि संख्यात्मक कौशल्ये
• किमान श्रेणी-स्तरीय क्षमता असलेल्या मध्यम आणि माध्यमिक विद्यार्थ्यांना सहकार्य देणे
• विद्यार्थ्यांचा शिकण्याचा अनुभव वाढवण्यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण
• पालकांच्या सहभागाद्वारे सामुदायिक सहभाग – मातांना 'संगिनी' कार्यक्रमांतर्गत सामावून घेणे व त्यांना त्यांच्या/सामुदायिक मुलांच्या शिक्षणासाठी सहकार्य देण्याच्या उद्देशाने प्रशिक्षित करणे
• महामारीच्या आव्हानांवर मात करण्यासाठी विशेष संकरित मॉडेल (डिजिटल आणि समोरासमोर) तयार करणे
• प्रकल्प शाश्वततेसाठी शाळा, समुदाय आणि तज्ज्ञ संस्थांसोबत सहयोग करणे
उत्थानचे उद्दिष्ट मुंबईतील अधिकाधिक शाळांपर्यंत पोहोचणे व वंचित समुदायांच्या फायद्यासाठी एक मजबूत आणि अनुकरणीय मॉडेल तयार करणे आहे.
अदाणी फाउंडेशन बाबत
१९९६ मध्ये स्थापन झालेल्या, अदानी फाऊंडेशनचे आज १८ राज्यांमध्ये व्यापक कार्य आहे. ज्यात देशभरातील २४१० गावे आणि शहरे समाविष्ट आहेत. त्यामध्ये व्यावसायिकांचा एक चमू, जो नाविन्यपूर्णतेने लोकांचा सहभाग व सहयोग यांचा समावेश असलेल्या दृष्टिकोनासह कार्य करतो. ३.६७ दशलक्ष लोकांच्या जीवनाला स्पर्श करून आणि सामाजिक भांडवल निर्माण करण्याच्या दिशेने उत्कटतेने काम करत आहे. शिक्षण, सामुदायिक आरोग्य, शाश्वत उपजीविका विकास आणि पायाभूत सुविधा विकास या माध्यमातून अदाणी फाऊंडेशन ग्रामीण आणि शहरी समुदायांच्या समावेशक वाढ आणि शाश्वत विकासासाठी कार्य करते. त्याद्वारे राष्ट्र उभारणीत योगदान दिले जाते.
अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड बाबत
अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (एईएमएल) या विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अदाणी समूहाचा भाग आहे, एईएमएल ही ऊर्जानिर्मिती, पारेषण आणि किरकोळ वीज वितरणाचा एकात्मिक व्यवसाय आहे. एईएमएल भारतातील सर्वात मोठ्या व सर्वात कार्यक्षम वीज वितरण नेटवर्कची मालक असून त्याचे कार्यसंचालन पाहते. एईएमएल मुंबई व उपनगरातील ४०० चौरस किलोमीटर भागात पसरलेल्या ३ दशलक्षहून अधिक ग्राहकांना ९९.९९ टक्के खात्रीशीर सेवेसह २,००० मेगावॅट वीजेची गरज पूर्ण करते. हे प्रमाण देशातील सर्वोच्च आहे. एईएमएल प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्राहकांना सेवा देते.