Home > News > छात्रभारतीची अनोखी शिवजयंती!... शिवाजी कोण होता? च्या ५ लाख प्रती तरूणांमध्ये वाटणार…

छात्रभारतीची अनोखी शिवजयंती!... शिवाजी कोण होता? च्या ५ लाख प्रती तरूणांमध्ये वाटणार…

छात्रभारतीची अनोखी शिवजयंती!...  शिवाजी कोण होता? च्या ५ लाख प्रती तरूणांमध्ये वाटणार…
X

शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजंची जयंती जगभर साजरी केली जाणार आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने ती साजरी करण्याचा प्रयत्न करून महाराजांना मानवंदना देईल. अशातच छात्रभारती या संघटनेने ही शिवजयंती दिवंगत समाजसेवक कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या ५ लाख प्रती विद्यार्थी आणि तरूणांमध्ये वाटून शिवजयंती साजरी करण्याचा निश्चय केला आहे. त्यांचे अभिनंदन करणारी फेसबूक पोस्ट ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी अपलोड केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त छात्रभारती विद्यार्थी संघटनेने शिवरायांच्या विचारांचा प्रसार प्रचार करण्यासाठी गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाच्या ५ लाख प्रती विद्यार्थ्यांमध्ये वाटप करण्याचा संकल्प छात्रभारतीने केला आहे.

देशात एकीकडे शाळा- कॉलेजांमध्ये धर्मांध शक्ती द्वेषाचं वातावरण पेटवत आहेत. म्हणून अठरापगड जाती-जमातींना सोबत घेऊन एकतेची प्रेरणा देणारे लोककल्याण राजा छत्रपती शिवराय यांचे विचार प्रत्येक विद्यार्थी-तरुणांच्या मनामनात-घराघरात पोहचवण्याची गरज आहे. आदर्शवत राजा, आदर्शवत राज्य, आदर्शवत प्रशासन, आदर्शवत शासन कसे असावे? जनकल्याणकारी राज्याची संकल्पना काय आहे हे नव्या पिढीच्या समोर आले पाहिजे हा प्रयत्न यामागे आहे.

या प्रयत्नाचा भाग म्हणून शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित " शिवाजी कोण होता?" हे पुस्तक ५ लाख विद्यार्थी-तरुणांपर्यंत पोहचवण्याचा संकल्प छात्रभारती विद्यार्थी संघटनेने केला आहे. केवळ पुस्तक वाटपच नव्हे तर हे पुस्तक मुलांनी वाचावे यासाठी सदर पुस्तकावर निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित करणार असल्याचे छात्रभारतीचे राज्य कार्याध्यक्ष रोहित ढाले यांनी सांगितले.

अभिनंदन छात्रभारती!

Updated : 18 Feb 2022 8:44 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top