Home > News > २० लाखाची गाडी वापरणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांना १५ रुपयांचे कणीस वाटते महाग..

२० लाखाची गाडी वापरणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांना १५ रुपयांचे कणीस वाटते महाग..

२० लाखाची गाडी वापरणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांना १५ रुपयांचे कणीस वाटते महाग..
X

पंधरा रुपयांना एक कणीस म्हणून केंदीय मंत्र्यांनी एका रस्त्याकडेला कणीस विकणाऱ्या विक्रेत्यांशी भावाबद्दल घासाघीस करत असलेला व्हिडिओ समोर आला आहे. तो विक्रेता त्यांना सांगत आहे की, मी तुम्हाला तुमची गाडी बघून हा भाव सांगितलेला नाही. मात्र मंत्री मंत्री महोदयांना हे १५ रुपयांचं कणीस महाग वाटते आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात महागाईच्या मुद्द्यावर चर्चा करावी या मागणीसाठी विरोध दररोज आंदोलन करत आहेत. महागाई वाढली असल्याने सामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रातर्फे कुणीही महागाईवर बोलत नाही, मात्र सध्या एका केंद्रीय मंत्र्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये मक्याचे १५ रुपयांचे कणीस त्यांना महाग झालेले वाटते आहे.

केंद्रीय मंत्री फग्गन सिंग कुलस्ते यांनीच हा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यामध्ये ते मध्य प्रदेशातील सिवनीहून मंडला येथे जाताना रस्त्यात मका विकणाऱ्या एका स्टॉलवर थांबले, तिथे पंधरा रुपयांना एक मका असा भाव ऐकून त्यांनी विक्रेत्याशी भावाबद्दल घासाघीस देखाली केल्याचे दिसते आहे. एवढेच नाही तर मक्क्याचे कणिस फुकटही मिळतात, असेही ते विक्रेत्या मुलाला सुनावताना दिसत आहेत.

त्यांनी हा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांना अनेकांनी ट्रोल केले आहे. २० लाखांची गाडी वापरणाऱ्याला एका केंदीय मंत्र्यांना रस्त्याकडेला कणीस विक्री करणाऱ्या विक्रेत्याचे १५ रुपयांचे कणीस महाग वाटते का? असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.


Updated : 22 July 2022 8:12 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top