#ModisFailedForeignPolicy ; युक्रेन रशिया युद्धः भारतीय विद्यार्थ्याचा रशियाच्या हल्ल्यात मृत्यू
X
रशिया युक्रेनमधील युध्द अधिक तीव्र झाले आहे. तर रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हसह खारकीव्हवर मिसाईल हल्ले सुरू केले आहेत. त्यातच रशियाने खारकीव्ह शहरात केलेल्या मिसाईल हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर परराष्ट्र मंत्रालयाचे अमरिंद बागची यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युध्द सुरू आहे. परंतू हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. तर भारत सरकारकडून विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान रशियाने युक्रेनच्या दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या खारकीव्हमध्ये मिसाईल हल्ला केला या हल्ल्यात कर्नाटक येथील नवीन शेखर्प्पा ज्ञानगोदर या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या वृत्ताला परराष्ट्र मंत्रालयाने दुजोरा दिला आहे.
दरम्यान रशिया आणि युक्रेनमधल्या युध्दाच्या सहाव्या दिवशी एकीकडे दोन्ही देशांमध्ये बोलणी सुरू आहे. तर दुसरीकडे रशियाने आपले आक्रमण आणखी तीव्र केले आहे. रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनचे ७० सैनिक ठार झाली आहे. खार्कीव्ह आणि कीव शहरांच्यामध्ये असलेल्या ओखत्यिर्का या भागात हा हल्ला झाले आहे. यामध्ये युक्रेनच्या लष्करी तळाचे मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यानंतर युक्रेनची राजधानी कीवजवळ रशियाचे सैन्य मोठ्या प्रमाणात जमू लागले आहे. त्यामुळे मंगळवारचा दिवस युक्रेनच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.
With profound sorrow we confirm that an Indian student lost his life in shelling in Kharkiv this morning. The Ministry is in touch with his family.
— Arindam Bagchi (@MEAIndia) March 1, 2022
We convey our deepest condolences to the family.
दरम्यान गेल्या पाच दिवसात युक्रेनकडून रशियाच्या सैन्याला कडवा प्रतिकार करण्यात येतो आहे. त्यामुळे पुतीन यांच्या अपेक्षेपेक्षा युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेण्यासाठी रशियन सैन्याला बरेच प्रयत्न करावे लागत आहेत. तर दुसरीकडे जगभरातील अनेक देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादल्याने रशियामध्ये आर्थिक प्रश्न निर्माण होऊ लागले आहे. युरो आणि डॉलरच्या तुलनेत रशियाच्या चलनाची मोठी घसरण झाली आहे. पण खार्कीव्ह या युक्रेनमधील दुसऱ्या क्रमाकांच्या शहरात रशियाने केलेल्या बॉम्ब हल्ल्यांमध्ये अनेक नागरिकांचे प्राण गेल्याचे वृत्तही काही माध्यमांनी दिले आहे. संयुक्त राष्ट्रसंघानेही युक्रेनमध्ये १०२ नागरिक ठार झाल्याचे सांगितले आहे. रशियन सैन्य कीवकडे वेगाने सरकत असल्याने आता युक्रेनमधील भारतीय दुतावासाने शहरातील भारतीयांना कीव शहर सोडण्याची सूचना केली आहे. भारतीय नागरिकांनी मंगळवारीच शहर सोडून जावे असे आवाहन केले आहे. तसेच ज्या ट्रेन उपलब्ध आहे त्याद्वारे किंवा जी वाहनं मिळतील त्याद्वारे शहर सोडण्याचा सल्ला भारतीय दुतावासाने दिला आहे.