Home > News > शर्मिला ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंची पाठराखण; काय ? म्हणाल्या शर्मिला ठाकरे

शर्मिला ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंची पाठराखण; काय ? म्हणाल्या शर्मिला ठाकरे

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या सर्वत्र चर्चा ?

शर्मिला ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंची पाठराखण; काय ? म्हणाल्या शर्मिला ठाकरे
X

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सतत दौरे करत सभा घेत आहेत. पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे धडपड करत असल्याची टीका होत आहे. या टीकेवर मनसे प्रमुख राज ठाकरे Raj Thackeray यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे Sharmila Thackeray यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंची पाठराखण केली आहे. त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येणार येणार का ? यावर सर्वत्र चर्चा सुरू झाल्या आहेत.

काय म्हणाल्या शर्मिला ठाकरे ?

दरम्यान ठाण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी विरोधकांनकडून होणाऱ्या उद्धव ठाकरेंवर टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे त्या म्हणाल्या की "पक्ष वाचवण्यासाठी असे म्हणू नये. प्रत्येक राजकीय पक्षाला फिरावे लागते. फक्त उद्धव ठाकरे फिरत नाहीत. सत्तेत असणारेही फिरतात. सत्तेत नसताना त्यांनाही फिरावे लागते. लोकांशी संपर्क ठेवावे लागतो. ते काय पक्ष वाढवण्याचा प्रयत्न नाही? प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्यासाठी फिरावे लागते." अशी प्रतिक्रीया त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूकी आधी ठाकरे कुटुंब एकत्र येणार का ? शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे एकत्र दिसतील का ? अशा चर्चा शर्मिला ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात सुरू झाल्या आहेत.

Updated : 12 Feb 2024 9:55 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top