कॅशियरला गोळ्या घालून अडीच लाखांची रोकड लंपास..
Max Woman | 30 Dec 2021 2:31 PM IST
X
X
बुधवारी सायंकाळी मुंबईतील दहिसर भागातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत काही हल्लेखोर घुसले आणि लुटमारीच्या उद्देशाने गोळीबार केला. यामध्ये बँक कर्मचारी गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या गोळीबारात बँकेचा सुरक्षा रक्षक जखमी झाला. या घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये दरोडेखोर बँकेत घुसून गोळीबार करताना दिसत आहेत. अडीच लाख रुपये असलेली बॅग लुटून आरोपींनी पळ काढला. घटनेनंतर 12 तासांतच पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले शस्त्रही जप्त करण्यात आले आहे.
Updated : 30 Dec 2021 2:31 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire