दिल्ली शहर का सारा मीना बाजार लेके.. शाळेत रंगला असा डान्स !
X
सोशल मीडियावर एक अतिशय गोंडस व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शिक्षिका आणि विद्यार्थिनींनी अप्रतिम डान्स करून अनेकांना आपल्या डान्सचं फॅन्स बनवलं आहेत. लहान असो वा मोठे, आजकाल सगळ्यांमध्येच डान्सची खूप क्रेझ आहे. पालकही मुलांना डान्स क्लासेसमध्ये घालण्यास उत्सुक असतात. अशा परिस्थितीत जेव्हा शिक्षक शाळेत मुलांना नृत्य शिकवू लागतात, तेव्हा यापेक्षा चांगले काय असू शकते.
विद्यार्थिनींना असे शिकवले
या व्हिडिओमध्ये विद्यार्थिनी आलटून-पालटून डान्स स्टेप्स करताना दिसत आहेत. काही विद्यार्थिनींनंतर त्यांच्या शिक्षकाही नाचताना दिसतात. पार्श्वभूमीत हिरवा फलक आणि काही बेंच दिसतात याचा अर्थ ही शाळेची वर्गखोली आहे. आधी तुम्ही हा व्हिडिओ पहा...
दिल्ली शहर का सारा मीना बाज़ार ले के।☺️
— Manu Gulati (@ManuGulati11) June 16, 2022
Our imperfect dance moves on the last day of summer camp...leading to some perfect moments of joy and togetherness.💕#SchoolLife #TeacherStudent pic.twitter.com/K50Zi1Qajf
या व्हि़डीओमध्ये नृत्य ज्या शाळेत केलं जातंय ती शाळा दिल्लीतील सरकारी शाळा आहे आणि या सर्व मुलींबरोबर नृत्य करणाऱ्या शिक्षिकेचं नाव मनु गुलाटी असं आहे. त्यांनीच हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. त्यांनी व्हिडीओ शेअर करताना गाण्याचे बोल टाकले आहेत आणि सोबतच इंग्रजीत त्यांच्या या नृत्याबद्दल लिहिलं आहे. त्या म्हणतायत, "दिल्ली शहर का सारा मीना बाज़ार ले के| उन्हाळी शिबिराच्या शेवटच्या दिवशी आमच्या अपूर्ण डान्स स्टेप्स... आनंदाचे आणि एकतेचे काही परिपूर्ण क्षण घेऊन आल्या.
त्यांचं हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे. त्याच्या या ट्विटला आतापर्यंत ३२२९ रिट्विट्स तर २७ हजाराहुन अधिक लाइक्स आल्या आहेत. या व्हिडीओचं समाजमाध्यमांवर नेटकऱ्यांकडून कौतुक होतंय. अनेकांना या शिक्षिकेच्या प्रयत्नांची वाहवा केली आहे.