करोनाचा झपाटा सुरुच, राज्यात कोरोनाचे ६७,१२३ नवीन रुग्ण
Admin | 17 April 2021 9:34 PM IST
X
X
जगभरात करोनाचा हाहाकार पाहायला मिळतोय. देशात आणि राज्यात दिवसेंदिवस करोना विषाणूचे संक्रमण वेगाने पसरु लागले आहे. आज राज्यात ६७ हजार १२३ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले. आज राज्यात ५६,७८३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ३०,६१,१७४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.१८ एवढे झाले आहे. सध्या राज्यात एकूण ६ लाख ४७,९३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
आज राज्यात आज ४१९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५९% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,३५,८०,९१३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३७,७०,७०७ (१५.९९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५,७२,५८४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,६२३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
Updated : 17 April 2021 9:34 PM IST
Tags: COVID19 coronavirus
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire