असं काय घडलं की भर रस्त्यावर पडला कंडोमचा सडा...
पण रस्त्यावर अचानक इतके कंडोम आले कुठून?
X
औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. खंडाळा-परसोडा रस्त्यावर हजारो कंडोमचा ढिगार पडलेला पाहायला मिळाला आहे. ही घटना शनिवारी सकाळी समोर आली आहे. रस्त्यावर कंडोमचा असा सडा पाहून ग्रामस्थांनाही धक्काच बसला आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणात कंडोम कुठून आले आणि रस्त्यावर का फेकण्यात आले अशी चर्चा परीसरात रंगली होती.
वैजापूर तालुक्यात खंडाळा ते परसोडा येथे जाणाऱ्या रस्त्यावर हजारो कंडोम रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. मोढ्या अंतरापर्यंत हा सडा पडलेला होता. विशेष म्हणजे हे कंडोम बंद पाकिटात नव्हते नव्हते तर मोकळे होते. शिवाय त्यावर कोणताही लोगो किंवा कंपनीचं नावही छापलेलं पाहायला मिळालं नाही. भररस्त्यात असे पसरलेले कंडोम पाहबून गावकऱ्यांनी तसेच प्रवाशांनी तिथे न थांबणेच पसंचत केले.
ज्या ठिकाणी हा कंडोमचा सडा पडला होता त्यापासून तीन किलोमीटर अंतरावर जिल्हा परीषदेचं आरोग्य केंद्र आहे. अनेकदा प्रशासन विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आरोग्य केंद्रामध्ये कंडोमचा पुरवठा करत असतं. त्यामुळे हा तोच कंडोमचा साठा नाही ना? असा प्रश्न उपस्थितांकडून चर्चिला जातोय. यावरील कोणतीही अधिकृत माहिती अद्यापही समोर आलेली नाही. परंतू स्थानिकांमध्ये या घटनेमुळे संताप पहायला मिळतो आहे.