Home > News > एकनाथ शिंदेंसोबत नाराज गटात एकही महिला आमदार नाही..

एकनाथ शिंदेंसोबत नाराज गटात एकही महिला आमदार नाही..

एकनाथ शिंदेंसोबत नाराज गटात एकही महिला आमदार नाही..
X

शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री एकानाथ शिंदे नाराज असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्रीपासून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे 22 आमदार नॉटरिचेबल आहेत. एकनाथ शिंदे भाजपच्या संपर्कात असल्याचे सुद्धा म्हंटले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत नाराज असलेल्या आमदारांची नावं समोर येत आहेत. या नावांमध्ये एकही महिला आमदार नसल्याचं दिसत आहे. नाराज आमदारांची जी नावे समोर येत आहेत त्यात एकनाथ शिंदे श्रीनिवास वनगा, महेश शिंदे, संदीपान भुमरे, शांताराम मोरे , डॉ. संजय रायमूलकर, विश्वनाथ भोईर, अनिल बाबर, रमेश बोरनारे, संभाजी पाटील, किशोर पाटील, चिमणराव पाटील

महेंद्र दळवी, प्रदीप जयस्वाल, शंभूराजे देसाई, ज्ञानराज चौगुले, डॉ.बालाजी किनीकर, सुहास कांदे, प्रकाश आबीटकर, राजकुमार पटेल - अपक्ष या आमदारांची नावे समोर आली आहेत. आता ही जर सगळी नावं पाहिली तर यामध्ये एकाही महिला आमदाराचे नाव दिसत नाही.

सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे आमदार नाराज आहेत यावरून, महिला आमदार नाराज का होत नसाव्यात? असा एक प्रश्न MaxWoman च्या संपादिका प्रियदर्शन हिंगे यांनी ट्विट केला होता.

त्यांच्या या ट्विट ला अनेकांनी कॉमेंट करत काही प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्या प्रतिक्रिया काय आहेत ते देखील आपण पाहूयात.

Nilesh Deshbhrtar यांनी त्यांचा ट्विट ला रिप्लाय करत म्हटलं आहे की, कारण त्या फक्त नावाचे आमदार असतात खरे आमदार तर त्यांच्या घरचे पुरुष 'अघोषित' आमदार असतात.

Tejesh Kulthe हे ट्विटर वापरकर्ते म्हणत आहेत की, नाराजी होण्याआधी राजी होण्याचा अधिकार आपल्याकडे असावा लागतो. बहुतांशी महिला राजकारणी हा अधिकार आपल्या पुरुषांकडे सोपविण्यात समाधानी असतात.

Maoochakaka हे ट्विटर वापरकर्ते म्हणताहेत की, वसुंधरा राजेंनी एखादी कार्यशाळा घेतली पाहिजे महिला आमदारांसाठी..

तर अशा प्रकारच्या कमेंट्स या ठिकाणी आपल्याला आलेल्या पाहायला मिळतात. काल संध्याकाळपासून एकनाथ शिंदे नॉटरीचेबल असल्याच्या बातम्या येत आहेत. ते व त्यांच्या संपर्कातील काही आमदार अहमदाबादच्या दिशेने रवाना झाल्याची वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे 22 आमदार हॉटेलमध्ये आहेत. पण या 22 आमदारांमध्ये एकही महिला आमदार नसल्याने ही चर्चा ट्विटरवर रंगली आहे.

Updated : 21 Jun 2022 2:02 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top