Home > News > हा राजवाडा जिल्हा परिषदेची शाळा आहे..

हा राजवाडा जिल्हा परिषदेची शाळा आहे..

हा राजवाडा जिल्हा परिषदेची  शाळा आहे..
X

शिक्षणाने माणसाचा कायापालट होतो , तर ज्ञानदान करणाऱ्या शाळांचा कायापालट झाला तर शिक्षणाला नवा मार्ग मिळू शकतो. हाच विचार करुन सांगलीच्या समडोळी येथील जिल्हा परिषद मुलींच्या शाळेला राजवाड्याचे स्वरूप देण्यात आले आहे. रूपडे पालटलेली ही शाळा सध्या लक्षवेधी ठरत आहे. बाहेरून पाहिलात तर तुम्हाला हा एक राजवाडा दिसेल.., दिसेल म्हणजे काय हा एक राजवाडाच आहे पण या राजवाड्याचे आता शाळेत रूपांतर झाले आहे. कोणी कल्पना पण करू शकणार नाही अशी जिल्हा परिषदेशी शाळाही.. मग या राजवाड्याचे शाळेत रूपांत कसे झाले? या राजवाड्याच्या प्रत्येक भिंती मुलांना शिक्षणाचे धडे कशा प्रकारे देत आहेत? आणि मुळात ही संकल्पना कोणाला व कशी सुचली? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा..


मुलींना आनंददायी वातावरणात शिक्षण घेता यावे यासाठी मिरज तालुक्यातील समडोळी येथील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेला शैक्षणिक राजवाड्याचे रूप देण्यात आले. कोरोनाच्या काळात खुल्या वातावरणातील शिक्षणावर संक्रांत आली. अडचणींवर मात करीत शिक्षणाचा प्रवाह सुरू ठेवण्याचा प्रयत्न झाला. आता त्यापुढे पाऊल टाकून आनंददायी शिक्षणासाठी पाऊल टाकण्यात आले आहे. मुख्याध्यापक कृष्णात पाटोळे यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून शाळेला शैक्षणिक राजवाड्याचे रूप प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शाळेची वास्तू पूर्वी वाड्यात होती. तेथेच अत्याधुनिक साधने वापरून गतकाळातील राजवाडा पुन्हा साकारण्यासाठी काम सुरू आहे. गटशिक्षणाधिकारी गणेश बांबुरे, शिक्षण विस्तार अधिकारी श्रद्धा कुलकर्णी आणि सहायक शिक्षक संचालक नामदेव माळी आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शाळेला सदिच्छा भेट देऊन शैक्षणिक गुणवत्ता, प्रगतीचे कौतुक केले आहे. शिक्षक संतोष गुरव, प्रतीक्षा देवळेकर, दीपाली मगदूम, मुख्याध्यापक पाटोळे प्रयत्नशील आहेत. मुंबईचे प्रख्यात चित्रकार चंद्रकांत सुतार यांच्या कुंचल्यातून आणि शिक्षकांच्या संकल्पनेतून शाळेत सध्या रंगकाम झाले असून चित्रे रेखाटली जात आहेत. शाळेच्या प्रत्येक भिंतीवर चित्रातून सामाजिक, ऐतिहासिक, भौगोलिक संदर्भ मांडला जात आहे. शाळेतील प्रत्येक वर्गात बैठकीसाठी उत्तम मॅट, ई लर्निंगसाठी स्मार्ट डिजिटल बोर्ड, प्रोजेक्टरची सोयही उपलब्ध केली आहे. शाळेच्या भिंतीवरील जिवंत आणि त्रिमितीय चित्रे शिक्षणात नवा रंग भरत आहेत.

Updated : 18 March 2023 8:57 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top