Video ; कर्जाचे हप्ते दिले नाहीत म्हणून वसुली एजंटची महिलेला सोसायटीत सगळ्यांसमोर शिवीगाळ...
X
वसुली एजंटने महिलेला सोसायटीत जाऊन दादागिरी करत सगळ्यांसमोर शिवीगाळ केल्याचा धक्कादायक आरोप ठाण्यातील शीतल तारू यांनी केला आहे. खरतर हे वसुली अजेंट असे दादागिरी करून हप्ते वसूल करत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. थकलेल्या कर्जाची वसुली कशी करावी याबाबत रिझर्व बँकेने काही नियमावली ठरवून दिली आहेत. पण कुठल्याही प्रकारे कायदेशीर पद्धतीने न जाता हे वसुली एजंट लोकांकडे जाऊन अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत. हे इतकं सगळं होत असताना येथील पोलीस तसेच बँकिंग यंत्रणा गप्प का आहेत?
अशाच प्रकारची एक घटना ठाण्यात राहणाऱ्या शितल तारू यांच्यासोबत घडली आहे. त्यांनी एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. घेतलेल्या कर्जाचे हप्ते काही महिन्यांपासून भरले नव्हते. हे हप्ते वसूल करण्यासाठी वसुली एजंट त्यांच्या पाठी मागे हात धुवून लागले होते. अक्षरशहा त्यांच्या सोसायटी मध्ये जाऊन सर्वांसमोर शिवीगाळ करत हप्ते मागण्यासाठी हे वसुली एजंट जात होते. इतकंच नाही तर ज्यावेळी त्या घरी नसतात त्यावेळी घराबाहेर येऊन कडेच्या लोकांना देखील विचारपूस केली जात होती व आजूबाजूला राहणार्यांना देखील माझ्या बाबत कॉल करून सोसायटी मध्ये असा गदारोळ करून माझी बदनामी करत असल्याचं शीतल तारू यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितलं.
खरतर सर्वसामान्यांना सहज सुलभ पद्धतीने कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध व्हावे, सावकाराच्या जाचातून त्यांची सुटका व्हावी, यासाठी राष्ट्रीयीकृत, सहकारी बँका, पतसंस्था आणि सावकारी विरोधी कायदा करण्यात आला. पण या बँकांच्या वसुली अजंटणी सुद्धा सवकाराप्रमाणेच कर्जदारांकडे तगादा लावत असल्याच्या घटना समोर येत आहेत. आज अनेक खासगी फायनान्स कंपन्या अस्तित्वात आल्या आहेत त्यांच्याकडून घेतलेल्या कर्जाची वसुली कायद्याच्या चौकटीत आणि थकबाकीदाराला असह्य होणार नाही या पद्धतीनेच व्हायला हवी. पण, वसुली एजंट म्हणून वावरणाऱ्या काही गुंडांच्या टोळ्या थकबाकीदारांना जगणं सुद्धा असहाय्यक करतं आहेत.