क्रूरता! हुंड्यासाठी लालची सासऱ्याने हात धरला, सासूने दिली ब्लेड, पतीने छातीवर बसवून नाक कापलं
X
शिवपुरी जिल्ह्यातील बमौरकलन भागातील धोंगा गावात हुंड्यासाठी सासूने सुनेला बेदम मारहाण केली आणि पतीने ब्लेडने तिचे नाक कापले. रक्तबंबाळ अवस्थेत महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या क्रूर घटनेनंतर सर्वच स्तरावरून संताप व्यक्त केला जात आहे.
पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या जावाबत म्हंटले आहे की, सोमवारी सकाळी 11 वाजता शेतात गवत कापत होते. तेवढ्यात तिचे पती, सासरे आणि सासू आले. तुझ्या आई-वडिलांनी (हुंड्यात) काहीही दिले नाही, मग आमच्या घरात का राहते. मात्र त्यांना उत्तर देतांना मी या घरची सून असून, मी इथचं राहणार.
पिडीताच्या या उत्तरानंतर सासऱ्याने आधी महिलेला पकडले तर सासूने ब्लेड आणून मुलाला दिली. त्यांनतर महिलेच्या पतीने आपल्या बायकोची ब्लेडने नाक कापली. त्यामुळे महिलेने आरडाओरडा केला असता इथेच राहणारी तिची बहीण तिला वाचवण्यासाठी आली. मात्र तिलाही पिडीताच्या नवऱ्याने मारहाण केली. यानंतर काही लोकांनी येऊन त्यांना वाचवले,असल्याचा आरोप या महिलेने केला असून,त्यानुसार पती रामप्रवेश वंशकर, सासरा मुन्ना वंशकर आणि सासू किशनबाई यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला आहे.