Home > News > महिलेची टेम्पोत प्रसूती,बाळ दगावलं; मलंगगड आदिवासी पाड्यातील दुर्दैवी घटना

महिलेची टेम्पोत प्रसूती,बाळ दगावलं; मलंगगड आदिवासी पाड्यातील दुर्दैवी घटना

महिलेची टेम्पोत प्रसूती,बाळ दगावलं; मलंगगड आदिवासी पाड्यातील दुर्दैवी घटना
X

अंबरनाथ : महिलेची प्रसूती टेम्पोमध्ये झाल्याने नवजात बाळ दगावल्याची दुर्दैवी घटना अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागात घडली आहे. म्हात्रे पाडा या आदिवासी पाड्यात राहणाऱ्या वंदना वाघे मध्यरात्री प्रसूतीसाठी मांगरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात टेम्पोतून घेऊन जाण्यात आले. मात्र या आरोग्य केंद्रात सुविधा नसल्याने वंदना यांच्या कुटूंबियांना स्थानिक कर्मचाऱ्यांनी परत पाठवले.

तसेच वंदना यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात घेऊन जा असेही आरोग्य केंद्रातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांना सांगितले. मात्र, वंदना यांना प्रसूतीसाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात घेऊन जात असताना मध्येच टेम्पोत त्यांची प्रसूती झाली. यात त्यांचे बाळ दगावले.

मांगरूळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणत्या सुविधा नाहीत परिणामी अत्यावश्यक वेळी येथे रुग्णांवर उपचार न करता पुढे पाठवण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे या आरोग्य केंद्राचा नक्की उपयोग काय असा सवाल इथले रहिवासी करत आहेत. गेल्या वर्षभरात या ठिकाणी अशाच तीन घटना घडल्या असून त्यातही नवजात बाळ दगावले असल्याचं स्थानिकांचे म्हणणे आहे.

ग्राऊंड रिपोर्ट - ग्रामीण आरोग्य केंद्र कुणाच्या हितासाठी?

ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अजूनही सलाईनवर असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. तसेच राज्यातील अनेक भागात असलेले आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राची परिस्थती भयानक आहे. काही ठिकाणी तर आठ_आठ दिवस आरोग्य उपकेंद्र उघडलीच जात नसल्याचे चित्र आहे. मात्र याचा किमंत सर्वसामन्यांना आपला जीव देऊन मोजावी लागत आहे.

Updated : 2 July 2021 11:13 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top