लग्न विधी पार पाडल्यानंतर कुंकू लावण्यास वधूचा नकार, म्हणाली....
X
मुंबई: झारखंडमधील रांची शहरात एक आगळीवेगळी घटना समोर आली आहे, अर्ध्या लग्नानंतर नवरीने कुंकू लावण्यास नकार दिल्याने उपस्थितीत लोकांना धक्का बसला. तर वधू लग्नाच्या मंडपातून उठली आणि लग्न करण्यास नकार दिला, ऐनवेळी वधूने लग्नासाठी नकार दिल्याने वराकडच्या लोकांमध्ये गोंधळ उडाला.
रांचीच्या मांडर भागातील रहिवासी विनोद लोहराच लग्न रांचीच्याच धुर्वा भागातील मौसीबाड़ी येथे राहणाऱ्या चंदा लोहरा बरोबर ठरलं होतं. त्यामुळे 29 जून रोजी विनोद वरात घेऊन चंदाच्या घरी पोहोचला.
लग्नाच्या सर्व विधी सुरू झाल्या. दोघांनी एकेमकांना पुष्पहार देखील घातले, त्यानंतर चंदा आणि विनोद यांनी सात फेऱ्याही मारल्या, पण कुंकू दान करण्याची वेळ होताच, वधू चंदा अचानक मंडपातून उठली आणि निघून गेली. मला नवरा आवडला नसून, लग्न करण्यास तिने नकार दिला.
चंदाच्या निर्णयामुळे मुलाकडच्या लोकांमध्ये एकच धावपळ उडाली. त्यानंतर एकतर लग्न लावून वधूने सोबत चलाव अन्यथा लग्नासाठी झालेल्या आमच्या खर्चाची भरपाई द्यावी यावर विनोद अडून बसला.
त्यामुळे लग्नात झालेल्या खर्चाच्या मागणीसाठी मुलाकडचे मंडळी विनोदसोबत नवरीच्या घरासमोर ठाण मांडून बसले. पण देण्यासाठी माझ्याकडे देण्यासाठी पैसे नाहीच, अशी भूमिका चंदाच्या वडिलांनी घेतली. त्यामुळे दोन्ही कडच्या मंडळींमध्ये बराच काळ गोंधळ सुरु होता. पुढे हे प्रकरण पोलिसात गेल्याने काय झालं हे कळू शकलं नाही.