एसटी बंद केली सरकारने, पाय भाजत्याती म्हणत चिमुकली म्हैशीवर बसून चालली शाळेला
शाळेचा छान ड्रेस घालून, पाठीला दप्तर अडकून म्हैशीवर बसून शाळेला निघालेल्या एका चिमुकलीचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
X
उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. रखरखत्या उन्हात साध घरातून बाहेर पडणं देखील मुश्किल झाले आहे. आशा उन्हात लहान मुलांना शाळेत देखील जावं लागत आहे. त्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील बससेवा बंद आहेत. ST आणि ग्रामीण भागाचा फार जवळचा संबंध आहे.
आता एसटीच बंद झाल्यामुळे ग्रामीण भागातील अनेक लोकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हे सगळं होत असताना समाज माध्यमांवर एका चिमुकलीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायला होत आहे. ती चिमुकली शाळेचा ड्रेस घालून, पाठीवर दप्तर अडकून चक्क म्हैशीवर बसून शाळेला निघाली आहे. त्यावेळी कडेला उभा असलेला व्यक्ती तिला म्हैशीवर बसून कुठे चालली बाळा? असं विचारताच त्या मुलीने दिलेले उत्तर फारच वेदनादायी आहे. चिमुकली म्हणते "शाळेला चालली, एसटी बंद केली सरकारनं. एसटी बंद केल्यामुळे काही करता येत नाही. पाय भाजत्याती" असं म्हणत म्हैशीवर बसून ती शाळेला निघाली आहे.
आता हा व्हिडिओ कोणी जाणूनबुजून मजेखातीर बनवला आहे का हे माहीत नाही पण ती चिमुकलीने अनेकांची मने जिंकली आहेत.शाळेचा छान ड्रेस घालून, पाठीला दप्तर अडकून म्हैशीवर बसून शाळेला निघालेल्या एका चिमुकलीचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.