Home > News > मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी, दुबईवरून आला होता फोन; फोन करणारा मानसिक आजारी...

मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी, दुबईवरून आला होता फोन; फोन करणारा मानसिक आजारी...

मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी, दुबईवरून आला होता फोन; फोन करणारा मानसिक आजारी...
X

महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर देशाची आर्थिक राजधानी मुंबईला काल शनिवारी संध्याकाळी उशिरा बॉम्बस्फोटाची धमकी देणारा फोन आला होता. 26/11 चा दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी देखील आशा प्रकारे 13 दिवस आधी फोनवरून धमकी देण्यात आली होती. त्यामुळे काल आलेल्या या फोनमुळे नागरिकांच्यात भीतीचे वातावरण होते. मात्र, रात्री उशिरा पोलिसांनी फोन करणाऱ्याची ओळख पटवली आहे. जी.आर. पी मुंबईच्या म्हणण्यानुसार, कॉलर त्याच्या आईसोबत दुबईत राहतो आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे. गेल्या आठवड्यातही या व्यक्तीने गुजरातमधील गांधीधाम येथील एका पोलीस अधिकाऱ्याला फोनवरून अशीच माहिती दिली होती. पोलिसांनी या व्यक्तीच्या कुटुंबीयांशी बोलल्यानंतर याला दुजोरा दिला आहे.

काल रात्री उशिरा मुंबईच्या वांद्रे स्थानकावर रेल्वे पोलिसांना फोन..

मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकावर काल एका अज्ञात व्यक्तीने रेल्वे पोलिसांना फोन केला. फोनवर या मतेफिरूने अख्खे शहर बॉम्बने उडवणार असल्याचे सांगितले. या फोन कॉलनंतर पोलीस दल सतर्क झाले असून सर्वच ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. विशेषतः सर्व रेल्वे स्थानकांवर सतर्कता ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय सर्व संबंधित सुरक्षा यंत्रणांनाही रेल्वेकडून धमकीच्या कॉलची माहिती देण्यात आली आहे.

रेल्वे पोलीस आयुक्तांनी घाबरण्याची गरज नसल्याचे म्हंटले आहे.

मुंबईचे रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी स्वत: सर्वांना धमकीच्या कॉलची माहिती दिली. खालिद यांनी ट्विट केले की, मुंबईतील संभाव्य बॉम्ब हल्ल्याची माहिती आज वांद्रे आरपीएसला दूरध्वनीवरून मिळाली आहे. कॉलरशी संपर्क साधण्यात आला आहे. सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सर्व सहाय्यक संस्थांना कळविण्यात आले आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. कोणालाही घाबरण्याची गरज नाही. असं त्यांनी ट्विट करून म्हंटल आहे.

Updated : 14 Nov 2021 8:47 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top