Home > News > चिंताजनक! 4 जुलैपासूनच कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली आहे, शास्त्रज्ञाने केला दावा

चिंताजनक! 4 जुलैपासूनच कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली आहे, शास्त्रज्ञाने केला दावा

चिंताजनक! 4 जुलैपासूनच कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली आहे, शास्त्रज्ञाने केला दावा
X

कोरोनाचा पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, तिसऱ्या लाटेला प्रत्यक्षात सुरवात झाली असल्याचा दावा, हैदराबाद विद्यापीठाचे प्र-कुलगुरू असलेले ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ यांनी केला आहे. भारतात कोविड -19 ( covid 19 ) ची तिसरी लाट 4 जुलैपासून सुरू झाली असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला आहे.

प्र-कुलगुरू डॉ. विपिन श्रीवास्तव (Vipin Srivastava) म्हणाले की, 4 जुलै ही तारीख या वर्षाच्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यासारखी दिसते. श्रीवास्तव यांनी 24 तासांच्या कालावधीत लागण होणाऱ्या मृत्यूची संख्या आणि त्याच काळात उपचार घेत असलेल्या नवीन रूग्णांच्या संख्येचा अभ्यास केला आणि त्याला त्यांनी डीडीएल (DDL) असे नाव दिले.

पुढे ते म्हणाले की, आम्ही डीडीएलमधील ही अस्थिरता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी सुरू केली. त्यावेळी संक्रमणामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या 100 किंवा त्यापेक्षा कमी होती, त्यामुळे साथ संपली असे आम्हाला वाटले होते. मात्र नंतर परिस्थिती भयानक झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. श्रीवास्तव म्हणाले की, ही परिस्थिती 4 जुलैपासून सुरु झाली आहे.

Updated : 13 July 2021 11:31 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top