Home > News > दहावीच्या पेपर दरम्यान विद्यार्थ्यांना शिक्षकच पुरवत होते कॉपी..

दहावीच्या पेपर दरम्यान विद्यार्थ्यांना शिक्षकच पुरवत होते कॉपी..

दहावीच्या पेपर दरम्यान विद्यार्थ्यांना शिक्षकच पुरवत होते कॉपी..
X

सध्या महाराष्ट्रात दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. कोरोना नंतर पहिल्यांदाच ऑफलाइन पद्धतीने 10 वीच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. मुलांना गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने विद्यार्थी ज्या शाळांमध्ये ते शिक्षण घेत आहेत त्याच शाळांमध्ये त्यांना परीक्षा केंद्र देण्याचा निर्णय घेतला. आणि त्यानुसार आता मुले आपापल्या शाळांमध्येच परीक्षा देत आहेत. परीक्षा सुरू झाल्यानंतर या परीक्षांमध्ये होणारे अनेक गैरप्रकार देखील समोर आले.

औरंगाबाद जिल्यातील जय भद्र बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या जय भद्र बहुउद्देशीय शिक्षण संस्थेमध्ये एक धक्कादायक प्रकार मागच्या काही दिवसांपूर्वी समोर आला होता. चक्क दहावीच्या मराठीच्या पेपर दरम्यान विद्यार्थ्यांना शिक्षकच पुरवत असल्याचं समोर आल्यानंतर काळ विधिमंडळात याचे पडसाद उमटले व राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या शाळेची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं आहे.


Updated : 17 March 2022 8:55 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top