Home > News > सुप्रीम कोर्टाचे निर्देश; राखी सावंत होणार चार आठवड्यात सरेंडर ?

सुप्रीम कोर्टाचे निर्देश; राखी सावंत होणार चार आठवड्यात सरेंडर ?

आदिल दुर्रानी याने गुन्हा दाखल केल्यानंतर राखीने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनअर्ज दाखल केला होता.

सुप्रीम कोर्टाचे निर्देश; राखी सावंत होणार चार आठवड्यात सरेंडर ?
X

पूर्वीचा पती आदिल दुर्रानी याचे अश्लिल व्हिडिओ सार्वजनिक केल्याप्रकरणी अभिनेत्री राखी सावंतवर गुन्हा दाखल झाला होता. आदिल दुर्रानीचे अश्लिल व्हिडिओ सार्वजनिक करण्याच्या वादात सापडलेली अभिनेत्री राखी सावंत हिला अटकपूर्व जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पुढील चार आठवड्यात सरेंडर करा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

आदिल दुर्रानी याने राखी सावंत विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर राखीने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनअर्ज दाखल केला होता. मात्र उच्च न्यायालयाने तिला दिलासा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर ती दुबईत वास्तव्याला गेली होती. डिसेंबर 2022 मध्ये राखी सावंत हिने दुर्रानीसोबत लग्न झाल्याचा दावा केला होता. या लग्नाला दुर्रानी यानेही दुजोरा दिला होता. याच्या काही दिवसानंतर राखीने आदिलवर हिंसाचार आणि छळवणुकीचा आरोप करत तक्रार दाखल केली होती.

राखीच्या तक्रारीनंतर आदिलला पोलिसांनी अटक केली होती. तुरुंगातून बाहेर पडल्यावर आदिल याने राखीवर त्याचे अश्लिल व्हिडिओ लिक केल्याचा आरोप केला होता. दुर्रानी याच्या आरोपानुसार पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 34 आणि कलम 500 तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 ए नुसार राखीविरोधात गुन्हे दाखल केले होते. व्हाटस्अप आणि इतर डिजिटल माध्यमांतून आपले अश्लिल व्हिडिओ जारी करण्यात आले असल्याचा दुर्रानी याचा दावा आहे.

Updated : 22 April 2024 5:22 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top