Home > News > प्रभू श्रीराम-सीतेच्या विवाहाचं गुपित! वय आणि इतर काही तथ्य

प्रभू श्रीराम-सीतेच्या विवाहाचं गुपित! वय आणि इतर काही तथ्य

रामनवमीच्या दिनी, प्रभु श्रीराम आणि माता सीता यांच्या जीवनातील काही मनोरंजक तपशील जाणून घेऊया.

प्रभू श्रीराम-सीतेच्या विवाहाचं गुपित! वय आणि इतर काही तथ्य
X

रामायण, हिंदू धर्मातील सर्वात पवित्र ग्रंथांपैकी एक, भगवान राम आणि माता सीता यांच्या अद्भुत कथा सांगते. आज आपण या कथेतील एका महत्त्वाच्या पैलूवर लक्ष केंद्रित करणार आहोत - प्रभु राम आणि माता सीता यांच्या लग्नाचा काळ आणि त्यांच्यातील वयफरक कीती याची सर्वांचं माहिती असेल असे नाही याबाबत जानकारांमध्ये अनेक समज आणि गैरसमज आहेत.

गोस्वामी तुलसीदास यांच्या रामचरितमानसात एक श्लोक आहे जो प्रभु राम आणि माता सीता यांच्या लग्नाचा काळ आणि त्यांच्यातील वयफरक कीती याचे तपशील देतो !

"वर्ष अठ्ठारह की सिया, सत्ताईस के राम || कीन्हो मन अभिलाष तब, करनो है सुर काम" !

या श्लोकाचा अर्थ असा होतो की सीता माता 18 वर्षांच्या होत्या तेव्हा प्रभु श्रीराम 27 वर्षांचे होते. याचा अर्थ असा की दोघांमध्ये 9 वर्षांचा वयफरक असून लग्नाच्या वेळी, प्रभु श्रीराम यांचे वय 25 वर्षे होते, तर माता सीता यांचे वय 16 वर्षे होते.

सीता माता राजा जनक आणि राणी सुनयना यांच्या कन्या होत्या. श्रीराम आणि माता सीता यांची भेट स्वयंवरात झाली होती, जिथे सीता मातेने अनेक राजकुमारांना हरवून प्रभु श्रीरामांना वर म्हणून निवडले होते.लग्नानंतर काही काळ श्रीराम यांनी राजराजवड्यात घालवला, आणि पुढे प्रभु श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांनी पुढील 14 वर्षे वनवासात घालवले. असं रामायणा मध्ये लिहिलेले तपशील आहेत. वनवासाच्या शेवटी, प्रभु श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येचे सिंहासन प्राप्त केले असं म्हटलं जातं.

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की रामायणाच्या वेगवेगळ्या आवृत्त्यांमध्ये राम आणि सीता यांच्या वयाबाबत थोडेसे फरक असू शकतात. तथापि, गोस्वामी तुलसीदास यांच्या रामचरितमानस हा सर्वात लोकप्रिय आणि व्यापकपणे स्वीकारलेला स्त्रोत आहे आणि वरील माहिती त्यावर आधारित आहे.

Updated : 17 April 2024 11:31 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top