तर ठरलं, 'या' तारखेपासून मिळणार विद्यार्थ्यांना दहावीच्या गुणपत्रिका
दहावीचा निकाल लागल्यानंतर पालकांपुढे प्रश्न होता तो निकालपत्र कधी मिळणार? पुणे विभागीय मंडळाकडून 7 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टला शाळांना गुणपत्रिका वितरित करण्यासाठी दिल्या जाणार आहे. मात्र विद्यार्थ्यांना ठराविक दिवशीच गुणपत्रिका नेण्याची सक्ती नसेल
X
पुणे : दहावीचा निकाल लागल्यानंतर पालकांपुढे प्रश्न होता तो निकालपत्र कधी मिळणार? पुण्यात दहावीच्या गुणपत्रिका या 9 ऑगस्टपासून देण्यात येणार आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठराविक दिवशीच गुणपत्रिका नेण्याची सक्ती विद्यार्थ्यांवर करू नये, अशा सूचना देण्यात आल्यात.
पुणे विभागीय मंडळाकडून 7 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टला शाळांना गुणपत्रिका वितरित करण्यासाठी दिल्या जाणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार त्यांना कोणतेही सक्ती न करता निकालपत्रक देण्यात यावे अशा सुचना शासनाने शाळांना दिल्या आहेत.
दहावीच्या परीक्षेचा निकाल 16 जुलै रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला होता. या परिक्षेत राज्यातील 99. 95 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर मुलांचा निकाल 99.94 टक्के, आणि मुलींचा निकाल 99.96 टक्के लागला आहे. निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांची आणि पालकांची धावपळ सुरू होते ती अकरावीच्या प्रवेशासाठी आणि त्यासाठी आता 9 ऑगस्टपासून गुणपत्रिका दिल्या जातील. लगेगच अकरावीतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर गेल्या वर्षीपासून शाळांचे नियोजन पुरते बिघडले आहे. मात्र तरी देखील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासन – प्रशासन प्रयत्न करत आहे.