Home > News > #covid19 ; महाराष्ट्रासह पाच राज्यांना सतर्कता वाढवण्याच्या सूचना..

#covid19 ; महाराष्ट्रासह पाच राज्यांना सतर्कता वाढवण्याच्या सूचना..

दिल्ली, हरियाणा, केरळ, महाराष्ट्र आणि मिझोराम राज्यात नवीन कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यांना सतर्कता वाढवण्याच्या आरोग्य सचिवांनी केल्या सूचना..

#covid19 ; महाराष्ट्रासह पाच राज्यांना सतर्कता वाढवण्याच्या सूचना..
X

चीन आणि अमेरिकेत कोविडच्या वाढत्या केसेस पाहता आरोग्य मंत्रालयाने पाच राज्यांना इशारा दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली, हरियाणा, केरळ, महाराष्ट्र आणि मिझोराम सरकारांना पत्र लिहिले आहे. यामध्ये आरोग्य सचिवांनी राज्यांना सतर्कता वाढवण्यास आणि संसर्गाचे प्रमाण वाढण्याच्या कारणांची गांभीर्याने चौकशी करण्यास सांगितले आहे. दरम्यान, गुजरातमध्ये एका व्यक्तीला XE प्रकाराची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईतील एका महिलेला XE प्रकाराची लागण झाल्याची नोंद झाली होती. मात्र, आरोग्य मंत्रालयाने याचा इन्कार केला आहे.

आरोग्य सचिवांनी सांगितले की, या पाच राज्यांमध्ये दररोज नवीन कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. हे पाहता, राज्य सरकारांनी परिस्थितीचा गांभीर्याने आढावा घ्यावा आणि आवश्यक असल्यास कोरोना बाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत. एकीकडे देशात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत असताना दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा, केरळ आणि मिझोराममध्ये गेल्या सात दिवसांत पॉझिटिव्ह रेट अचानक वाढला आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने केरळ, महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा आणि मिझोरामला अलर्ट पाठवला आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत केरळमध्ये 353, महाराष्ट्रात 113, हरियाणामध्ये 336 आणि मिझोराममध्ये 123 रुग्ण आढळले आहेत. देशातील परिस्थितीवर नजर टाकली तर, गेल्या २४ तासांत कोरोनाचे 1 हजार 109 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 43 जणांचा मृत्यू झाला आहे. परवा गुरुवारी देशभरात 1 हजार 33 कोरोना रुग्णांची नोंद झाली.

18+ वयोगटातील सर्व लोकांना तिसरा डोस

कोरोनाच्या नवीन प्रकारांच्या धोक्याच्या दरम्यान, सरकारने घोषित केले आहे की 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना 10 एप्रिलपासून कोरोना लसीचा तिसरा डोस दिला जाईल. आरोग्य मंत्रालयाने याला Precaution Dose असे नाव दिले आहे. हे आरोग्य कर्मचारी आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना विनामूल्य दिले जाणार आहेत. तर उर्वरित प्रौढांना यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत. हा डोस खाजगी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध करून दिला जाईल. हा डोस फक्त अशा लोकांना दिला जाईल ज्यांचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आहे.

Updated : 9 April 2022 1:28 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top