''आई बहिणीवर चढX कुX'' राणे समर्थकांची भाषा घसरली
X
नितेश राणे यांनी काल राहुल गांधी यांनी आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा देणारी कोणतीही पोस्ट समाजमाध्यमांवर केली नाही म्हणून ते चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट करत राहुल गांधींवर निशाणा साधला. पण खरंच राहुल गांधी यांनी शुभेच्छा दिल्या नाहीत का? हे पाहण्यासाठी आम्ही राहुल गांधी यांचे सर्व सोशलमिडीया हान्डेल तपासून पहिले. तर राहुल गांधी यांनी ट्विटर वर शुभेच्छा न देता फेसबुकच्या माध्यमातून मराठीतून शुभेच्छा दिल्या होत्या. आता राहुल गांधी यांनी शुभेच्छा दिल्या असताना कोणतीही खातरजमा न करता नितेश राणे यांनी राहुल गांधींवर थेट पप्पू म्हणत टीका केली. या मुळे त्यांच्या या ट्विटवर अनेकांनी संताप व्यक्त केला होता. लोकांनी व्यक्त केलेलय संतापाविषयी आम्ही मॅक्स वुमनवर 'अरे कोंबडी चोर .. नितेश राणेंच्या त्या पोस्टनंतर नेटकरी भडकले' अशी एक बातमी केली होती. कारण अनेकांनी अशा आशयाच्या कॉमेंट्स त्यांच्या ट्विट वर केल्या होत्या. आता हि बातमी राणे समर्थकांना फारच झोंबली आणि त्यांनी बो बातमीवर समाजमाध्यमांवरच आई-बहिणीचा उद्धार करणाऱ्या कॉमेंट्स केल्या आहेत.
अमर म्हेत्रे या फेसबुक वापरकर्त्याने कॉमेंट करत ''मॅक्स महाराष्ट्र च्या पत्रकाराच्या आई बहिणीवर चढX कुत्रX'' अशा अश्लील शब्दात कॉमेंट केली आहे. तर प्रशांत भोसले या फेसबुक वापरकर्त्याने सुद्धा अर्वाच्च भाषेत कॉमेंट करत म्हंटल आहे कि, ''Max च्या पत्रकाराच्या आयवर वाचX चढX'' खरतर समाजमाध्यमांवर कसे व्यक्त व्हायचं हे सुद्धा या लोकांना कळत नसेल तर अवघड आहे. आपलं मत जरूर व्यक्त करा पण आपण वापरत असलेली भाषा कशी आहे हे देखील पहिले पाहिजे. समाजमाध्यमांवर अशा प्रकारे आई-बहिणीचा उद्धार करणाऱ्या लोकांविरोधात सायबर पोलीस काही कडक कारवाई करणार कि नाही? हा देखील मोठा प्रश्न आहे.
अशी अश्लील भाषा वापरत समाजमाध्यमांवर कॉमेंट करणाऱ्यांविरोधात आता सायबर पोलिसांनी कडक पाऊले उचलली पाहिजेत. समाजमाध्यमांचा स्थर आता अत्यंत ढासळत चालेल पाहायला मिळतो आहे. तुम्हाला आमच्या पेजवर जाऊन काही लोक किती खालच्या पातळीला जात व्यक्त झाले आहेत हे पाहायला मिळेल. तुम्ही तुमचं मत जरूर व्यक्त करा टीका देखील करा. मात्र भाषेचा स्थर काय असावा याच थोडं भान ठेवलं पाहिजे इतकंच..