Home > News > इंटेलिजन्स ब्युरो मध्ये नोकरीची संधी...

इंटेलिजन्स ब्युरो मध्ये नोकरीची संधी...

इंटेलिजन्स ब्युरो मध्ये नोकरीची संधी...
X

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत इंटेलिजन्स ब्युरो (IB) 797 कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (JIO), ग्रेड II (तांत्रिक) भरती करणार आहे. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, कनिष्ठ गुप्तचर अधिकारी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 3 जून 2023 पासून सुरू होईल आणि 23 जूनपर्यंत चालेल. ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर पदासाठी भरती टियर-1, टियर-2 आणि टियर-3 परीक्षेनंतर केली जाईल. IB मध्ये ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसरच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज mha.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन करावा लागेल.

रिक्त जागा तपशील...

अनारक्षित-325

EWS-79

OBC-215

SC-119

ST-59

शैक्षणिक पात्रता काय असणं गरजेचं आहे?

इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन किंवा कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असावा. किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा फिजिक्स किंवा मॅथेमॅटिक्समध्ये B.Sc किंवा कॉम्प्युटर ऍप्लिकेशनमध्ये बॅचलर डिग्री आवश्यक आहे.

वयोमर्यादेची अट आहे का?

18 ते 27 वर्षांच्या दरम्यान वयोमर्यादा असणाऱ्या उमेदवाराला या ठिकाणी संधी आहे.

अर्ज शुल्क?

अनारक्षित, EWS आणि OBC - रु 500

इतर - 450 रु.

परीक्षा पद्धत कशी असेल?

IB ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर भर्ती 2023 मध्ये एकूण 100 गुणांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल. प्रत्येक प्रश्न 1 गुणाचा असेल. लेखी परीक्षेत १/४ निगेटिव्ह मार्किंग असेल.

निवड प्रक्रिया काही होईल?

ऑनलाइन लेखी परीक्षा

कौशल्य चाचणी

मुलाखत

कागदपत्र पडताळणी

वैद्यकीय तपासणी..

ही माहिती आपल्याला आवडली असेल तर आमचं चॅनेल Like आणि subscribe नक्की करा..

Updated : 31 May 2023 9:27 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top