Home > News > अलाहाबाद हायकोर्टाने लिव्ह-इन-रिलेशनशिपबाबत केली महत्त्वाची टिप्पणी

अलाहाबाद हायकोर्टाने लिव्ह-इन-रिलेशनशिपबाबत केली महत्त्वाची टिप्पणी

धर्मपरिवर्तनाशिवाय तरुण-तरुणी एकत्र राहत असतील तर ते बेकायदेशीर असेल असं हायकोर्टाने म्हटलं आहे. वेगवेगळ्या धर्माचे प्रेमी युगल लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणं बेकायदेशीर; हायकोर्टाची टिप्पणी...

अलाहाबाद हायकोर्टाने लिव्ह-इन-रिलेशनशिपबाबत केली महत्त्वाची टिप्पणी
X

दोन वेगळ्या धर्मातील लोकांना एकत्र राहण्यासाठी आता चक्क कायदेशीर परवानगी घ्यावी लागणार आहे याचे कारण कि, वेगवेगळ्या धर्माचे प्रेमी युगल लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणं बेकायदेशीर असणार असं अलाहाबाद हायकोर्टाने म्हटलं आहे. अलाहाबाद हायकोर्टाने लिव्ह-इन-रिलेशनशिपबाबत केलेल्या टिप्पणीमुळे पुन्हा चर्चांना तोंड फुटलं आहे. एका प्रेमी युगलाने संरक्षण मिळावे यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती रेनू अग्रवाल यांच्या एकल खंडपीठाने यावर सुनावणी घेतली.

धर्मपरिवर्तनाशिवाय तरुण-तरुणी एकत्र राहत असतील तर ते बेकायदेशीर असेल असं हायकोर्टाने म्हटलं आहे. अलाहाबाद हायकोर्टाने लिव्ह-इन-रिलेशनशिपबाबत महत्त्वाची टिप्पणी केली आहे. वेगवेगळ्या धर्माचे प्रेमी युगल धर्म परिवर्तनाशिवाय लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू शकत नाही.

कोर्टाने काय म्हटलं आहे

मुलगा हिंदू धर्माचा तर मुलगी मुस्लीम धर्मातील या प्रेमी युगलाने संरक्षण मिळावे यासाठी कोर्टात धाव घेतली होती. दोघे उत्तर प्रदेशातील कासिगंज येथील रहिवासी आहेत. प्रेमी युगलाचे म्हणणे होते की, त्यांनी कोर्ट मॅरेजसाठी अर्ज केला आहे. पण, त्यासाठी वेळ लागत आहे. तोपर्यंत आम्हाला संरक्षण पुरवलं जावं. कारण, त्यांच्यासोबत काही अघटित होण्याची शक्यता आहे.

न्यायमूर्ती म्हणाले की, धर्मांतरण केवळ लग्नासाठी आवश्यक नाही, तर विवाहाशी साधर्म्य दाखवणाऱ्या प्रत्येक संबंधासाठी ते आवश्यक आहे. त्यामुळेच लिव्ह-इन-शिवाय प्रेमी युगलाने एकत्र राहणे बेकायदेशीर आहे. कोर्टाने तरुण-तरुणीची याचिका फेटाळून लावली आहे.

दरम्यान, भारतामध्ये लिव्ह-इन-रिलेशनशिपबाबत कोणतीही व्याख्या स्पष्ट नाही. साधारणपणे, जेव्हा एखादे प्रेमी युगल लग्न न करता पती-पत्नीसारखं एकत्र राहते त्याला लिव्ह-इन-रिलेशनशिप म्हटलं जातं. प्रेमी युगलाच्या विरोधात बाजू मांडणारे वकील म्हणाले की, प्रेमी युगलाने धर्मांतरणाच्या कलम ८ आणि ९ नुसार धर्मपरिवर्तनासाठी अर्ज केलेला नाही. त्यामुळे त्यांचे एकत्र राहणे बेकायदेशीर आहे. दोन्ही बाजू ऐकून घेतलयानंतर हायकोर्टाने प्रेमी युगलाच्या विरोधात निर्णय दिला आहे.

Updated : 16 March 2024 2:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top