Home > News > तृतीयपंथीय साहित्य: मराठी साहित्यातील प्रतिबिंब आणि स्थान

तृतीयपंथीय साहित्य: मराठी साहित्यातील प्रतिबिंब आणि स्थान

तृतीयपंथीय साहित्य: मराठी साहित्यातील प्रतिबिंब आणि स्थान
X

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने "लोकशाही गप्पा" या कार्यक्रमाचा बारावा भाग "तृतीयपंथीय साहित्य: मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान" या विषयावर आयोजित करण्यात आला असून हा कार्यक्रम शुक्रवारी पर पडत आहे.

या कार्यक्रमानिमित्त तृतीयपंथीय साहित्य आणि एकूणच मराठी साहित्यावर चर्चा होणार आहे. मराठी साहित्यातील इतिहास आणि विकास सोबतच मराठी साहित्यातील तृतीयपंथीयांचे चित्रण: सकारात्मक आणि नकारात्मक पैलू. याही विषयी परिसंवाद 'लोकशाही गप्पा' या कार्यक्रमा निमित्त होणार आहे. पारलिंगी समाजा बद्दल लोकांमध्ये असलेला गैरसमज हा दूर होत असून या विषयी समाजामध्ये पारलिंगी साहित्याची लोकप्रियता वाढत आहे.

हा कार्यक्रम तृतीयपंथीय साहित्यावर प्रकाश टाकण्यासाठी आणि मराठी साहित्यातील त्याचे स्थान निश्चित करण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमातून पारलिंगी समुदायाच्या अनुभव आणि भावना व्यक्त करण्यासाठी साहित्याच्या माध्यमाचा कसा उपयोग होत आहे हे समजून घेण्यास मदत होणार आहे.

या कार्यक्रमात वक्ता म्हणून बिंदुमाधव खिरे (अध्यक्ष, बिंदू क्वीअर राइट्स फाऊंडेशन), प्रूनीत्त गौडा (पारलिंगी पुरुष - सामाजिक कार्यकर्ते), शमिभा पाटील (पारलिंगी सामाजिक कार्यकर्त्या), डैनियल्ला मॅक्डोन्सा (द्विलिंगी स्त्री सामाजिक कार्यकर्त्या) आणि विजया वसावे (पारलिंगी स्त्री - सामाजिक कार्यकर्त्या) यांच्यासह श्रीकांत देशपांडे (मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र) उपस्थित होते. डॉ. दीपक पवार (विभाग प्रमुख, राज्यशास्त्र, मुंबई विद्यापीठ) यांनी कार्यक्रमाचे संचालन केले असून मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने "लोकशाही गप्पा" हा कार्यक्रम आज शुक्रवारी पार पडणार आहे.

"लोकशाही गप्पा" या कार्यक्रमाचा बारावा भाग तृतीयपंथीय साहित्याच्या प्रगतीसाठी आणि मराठी साहित्यातील त्याच्या स्वीकृतीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. या कार्यक्रमातून तृतीयपंथीय समुदायाला सामाजिक स्वीकृती मिळवून देण्यासाठी साहित्यिक क्षेत्रातून काय योगदान दिले जाऊ शकते यावर विचार-विनिमय होणार आहे.

Updated : 2 Feb 2024 3:52 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top