धुळे जिल्ह्यात दुहेरी हत्याकांड, निर्दयी मुलानेच केला आई आणि आजीचा खून
X
धुळे तालुक्यातील तरवाडे या गावात झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा अखेर उलगडा झाला आहे. 19 वर्षीय मुलानेच आपल्या आईचा व आजीच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकून हत्या केली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. तीन दिवसांपूर्वी धुळे तालुक्यातील तरवाडे गावात दुहेरी हत्याकांडने संपूर्ण जिल्हा हादरला होता.
धुळे तालुका पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून या दुहेरी हत्याकांडाचा तपास सुरू असताना काही धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासादरम्यान उघडकीस आली आहे. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असता मुलानेच आई व आजीचा डोक्यात लोखंडी रॉड टाकून खून केला असल्याची माहिती उघडकीस आली.
आईच्या चारित्र्याच्या संशयावरून पोटच्या मुलानेच हे हत्याकांड केले असल्याचे निष्पन्न झाले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने या खुनी मुलाच्या मुसक्या 36 तासात आवळल्या असून त्याने या खुनाची कबुली देखील दिली आहे. रात्रीच्या वेळी दुचाकीवरून मुलाने आजीच्या घरी पोहोचून लोखंडी रॉड बाहेर झोपलेल्या आई व आजीच्या डोक्यात मारून या दोघेही मायलेकींची निर्घुणपणे हत्या करून त्या ठिकाणाहून पळ काढला होता. चंद्रभागा बाई माळी 65 व वंदना महाले 45 हे दोघेही मृत आई व मुलीची नाव आहेत.Teenagegrandmother