Home > News > India vs Pakistan क्रिकेट सामन्यात आज रंगणार काटो की टक्कर

India vs Pakistan क्रिकेट सामन्यात आज रंगणार काटो की टक्कर

India vs Pakistan क्रिकेट सामन्यात आज रंगणार काटो की टक्कर
X

महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत आज टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध आहे. केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर संध्याकाळी साडेसहा वाजता सामना सुरू होईल. संघाची सलामीवीर आणि उपकर्णधार स्मृती मानधना जखमी झाली. तिच्या बोटाला दुखापत झाली, त्यामुळे ती भारताचा पाकिस्तानविरुद्धचा पहिला सामना खेळू शकणार नाही. भारत-पाकिस्तान सामन्यानंतर रात्री 10.30 पासून ग्रुप-1 मध्ये श्रीलंका आणि बांगलादेशचा सामनाही रंगणार आहे.

पाकिस्तानविरुद्धचा इंडियाचा रेकॉर्ड उत्कृष्ट

ग्रुप-2 मधील दुसरा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. या गटातील पहिला सामना शनिवारी वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात झाला. भारत आणि पाकिस्तानच्या महिला संघांच्या T20 रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडियाचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. दोघांमध्ये आतापर्यंत 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. भारताने 10 जिंकले, तर केवळ 3 सामन्यात पराभव पत्करला.

विश्वचषकात पाकिस्तानचा 2 वेळा पराभव झाला आहे..

विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने भारताला 3 पैकी केवळ 2 वेळा T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पराभूत केले. महिला टी-20 विश्वचषकात दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 6 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 4 भारताने जिंकले. नुकत्याच झालेल्या महिला आशिया चषक स्पर्धेतही पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. पाकिस्तानच्या 137 धावांना प्रत्युत्तर देताना टीम इंडियाला केवळ 124 धावा करता आल्या होत्या. गेल्या काही सामन्यांचे रेकॉर्ड पाहिल्यास पाकिस्तानने भारताला अनेक प्रसंगी काटो की टक्कर दिली आहे. अशा परिस्थितीत टीम इंडिया पाकिस्तानला हलक्यात घेऊ शकत नाही.

स्मृती मानधना खेळणार नाही..

भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात संघाची सलामीवीर आणि उपकर्णधार स्मृती मानधना जखमी झाली. तिच्या बोटाला दुखापत झाली, त्यामुळे ती भारताचा पाकिस्तानविरुद्धचा पहिला सामना खेळू शकणार नाही.

१५ फेब्रुवारीला होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यापर्यंत स्मृती खेळणार की नाही याबाबत संघ व्यवस्थापनाने अद्याप काहीही सांगितलेले नाही. त्याच वेळी, पाकिस्तानची स्टार वेगवान गोलंदाज डायना बॅग देखील स्पर्धेपूर्वी दुखापत झाली आणि संपूर्ण स्पर्धेत तिला देखील खेळता येणार नाही आहे..

Updated : 12 Feb 2023 11:54 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top