मॅचदरम्यान बिर्याणीसोबत अचानक कंडोमची ऑर्डर वाढली तर त्यात काय इतकं..
X
यंदाच्या सिजरमध्ये आयपीएलचा फायनल सामना अत्यंत रोमांचक झाला. पावसामुळे या सामन्यात व्यत्यय आला आणि या सामन्याचा अंतिम निकाल येण्यासाठी दोन वाजेपर्यंत वाट पहावी लागली. आता दोन वाजेपर्यंत ही मॅच पाहत असताना. लोकांनी स्विगी या ऑनलाइन डिलिव्हरी अँप वरून काय काय मागवलं हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटणार हे मात्र नक्की.. कारण जेवणाबरोबर दुरेक्स कॉन्डोम सर्वाधिक ऑर्डर केले गेले. तर अशा बातम्या अनेक माध्यमांनी दिल्या मात्र खरंच यात आश्चर्य वाटण्यासारखं काही आहे का? आता तुम्हीच हा व्हिडिओ बघून ठराव..
रविवारी चेन्नई सुपर किंग आणि गुजरात टायटल यांच्यात झालेला सामना तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत विजयाचं पारड कोणत्या संघाकडे झुकतं याची उत्सुकता लागली होती. गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना 214 धावांचा डोंगर उभा केला होता. पण पावसाने व्यत्यय आणल्याने डकवर्थ लुईसनुसार (DLS) हे टार्गेट 15 ओव्हरमध्ये 171 धावांचं आव्हान ठेवण्यात आलं आणि अखेरच्या चेंडूवर रवींद्र जाडेजाने चौकार लगावत चेन्नईला पाचव्यांदा आयपीएलचा खिताब जिंकवून दिला.
मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत उत्साह वाढवणारी होती. पण या मॅचदरम्यान काय झालं तर पाऊस आला आणि आणि पावसामुळे मॅच रात्री उशिरापर्यंत चालली. म्हणजे दोन वाजेपर्यंत मॅच सुरू होती. त्यादरम्यान फूड डिलिव्हरी अँप Swaggi ने ट्विटरवर मॅच चालू असताना लोक कोणत्या पदार्थाची ऑर्डर देत होते याविषयी माहिती देणारे एक ट्विट केले. आणि ज्या ट्विटच्या सर्वत्र बातम्या झाल्या.. तर सामना लांबल्यामुळे स्विगीवर रात्रभर ऑर्डर दिल्या जात होत्या. त्यामध्ये अगदी साध्या पाण्याच्या बॉटल पासून दही साखर ते बिर्याणी अशा अनेक गोष्टी रात्रभर लोक ऑर्डर करत होते. स्विगीवर त्या दिवशी रात्री सर्वाधिक काय ऑर्डर केलं हे देखील त्यांनी सांगितलं. तर त्या रात्रीत तब्बल एक लाख वीस हजार लोकांनी बिर्याणीची ऑर्डर दिली. त्या रात्री सर्वाधिक ऑर्डर देण्यात आलेला पदार्थ हा बिर्याणी आहे. एका मिनिटाला बिर्याणीच्या 212 ऑर्डर येत होत्या. मध्ये पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला आता या मधल्या वेळात लोकांनी इतर गोष्टींमध्ये सुद्धा वेळ घालवल्याचं दिसतं याचं कारण अनेकांनी स्विगी वरून Durex कंडोम्सची ऑर्डर दिल्याची माहिती स्विगीने दिली आहे. स्विगी इन्स्टंट मार्ट च्या माध्यमातून 2 हजार 423 कॉन्डोम ची डिलिव्हरी करण्यात आली..
आता बिर्याणीच्या तुलनेत हा आकडा फार छोटा आहे आणि यात विशेष असं सुद्धा काही नाही. पण याच्या माध्यमांमध्ये बातम्या झाल्या. शेवटी लोकांना काहीतरी असं वेगळं वाचायला, पाहायला आवडतं त्यामुळेच बिर्याणी बरोबर कंडोम खपलं हे लोक वाचणार हे सर्वांना माहित आहे म्हणूनच अनेकांनी याच्या बातम्या केल्या असतील. पण यात तुम्ही आश्चर्यचिकित झालात असं काही आहे का? आता हसत बसू नका बाकी सगळं जाऊंदे हा सामना तुम्ही पहिला असेल तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जडेजाने शेवटच्या २ बॉलमध्ये लागवलेले षटकार तुम्हाला कसे वाटले कॉमेंटमध्ये नक्की कळवा...