'शट अप या कुणाल' मध्ये सुप्रिया सुळेंची मुलाखत?
X
स्टॅण्ड कॉमेडियन कुणाल कामराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचीही भेट घेतली आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या भेटीचा फोटो शेअर करत, विथ कुणाल कामरा असं लिहिलं आहे. त्यामुळे आता 'शट अप या कुणाल' या पॉडकास्टमध्ये पुढच्या पाहुण्या सुप्रिया सुळे तर नाहीत ना अशीही चर्चा रंगली आहे.
दोनच दिवसांपूर्वी मुंबईतील खारमधील एका स्टुडिओमध्ये कुणाल कामरा यांनी घेतलेल्या संजय राऊत यांच्या मुलाखतीचं चित्रीकरण पार पडलं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 12 ऑक्टोबरला कुणाल कामराने खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. त्यामुळे आता सुप्रिया सुळे आणि कुणाल कामरा यांची भेटही चर्चेचा विषय ठरत आहे. जर कुणाल कामरा सुप्रिया सुळेंची मुलाखत घेणार असेल तर त्यामध्ये कोणते विषय असतील याचीही उत्सुकता आहे.
दरम्यान कुणालने आतापर्यंत शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी, जेएनयू विद्यार्थी नेते कन्हैया कुमार आणि उमर खलिद, एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी, गीतकार जावेद अख्तर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार, काँग्रेस नेते मिलिंद देवरा, खासदार तेजस्वी सुर्या यांच्या मुलाखती घेतल्या आहेत.
With Kunal Kamra (@kunalkamra88). pic.twitter.com/3S7hs8BG6w
— Supriya Sule (@supriya_sule) October 12, 2020