Home > News > हरवलेल्या मुलासाठी आईनं ठोठावले सर्वोच्च न्यायालयाचे दार, पोलीस देत नाहीत दाद!

हरवलेल्या मुलासाठी आईनं ठोठावले सर्वोच्च न्यायालयाचे दार, पोलीस देत नाहीत दाद!

हरवलेल्या मुलासाठी आईनं ठोठावले सर्वोच्च न्यायालयाचे दार, पोलीस देत नाहीत दाद!
X

तेलंगणातील एक आई गेल्या ३ वर्षांपासून आपल्या हरवलेल्या मुलाच्या शोधासाठी न्यायालयीन लढा देतेय. पण या सगळ्यात एक धक्कादायक बाब म्हणजे ही आई आपल्या ज्या मुलाच्या शोधासाठी गेल्या ३ वर्षांपासून न्यायालयाचे उंबरठे झिजवतेय, त्या मुलाचा मृत्यू झाल्याचा अहवाल तेलंगणा पोलीसांनी तेलंगणा उच्च न्यायालयात २०१८ मध्येच सादर केला आहे.

तेलंगणा पोलीसांनी तेलंगणा उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अहवालानुसार ज्या मुलाची हरवल्याची तक्रार पोलीसात करण्यात आली आहे, त्याचा मृतदेह तेलंगणा मधील एका रेल्वे रूळाजवळ आढळून आला होता. पोलीसांनी हा अहवाल न्यायालयात सादर करून संबंधित प्रकरणाची चौकशी बंद केली होती. मात्र पीडित आईच्या म्हणण्यानुसार तो मृतदेह त्यांच्या मुलाचा नव्हता.

पीडित आईने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनुसार पोलीसांनी जो मृतदेह त्यांच्या मुलाचा समजून संबंधित प्रकरणाची चौकशी बंद केली, तो मृतदेह त्यांच्या मुलाचा नसून एका मुलीचा होता. रेल्वे रूळाच्या शेजारी आढळलेला मृतदेह एका २० वर्षीय मुलीचा होता. पण त्यांच्या मुलाचं वय फक्त १२ वर्ष होतं. पोलीसांनी रेल्वेरूळाच्या शेजारी आढळलेल्या मृतदेहाची ओळख न पटवताच प्रकरणाची चौकशी बंद केल्याचा आरोप या आईनं केला आहे.

सर्वोच न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी या आईची याचिका दाखल करून घेतली असून संबंधित प्रकरणाची चौकशी करून या हरवलेल्या मुलाला शोधण्याचे आदेश तेलंगणा पोलीसांना दिले आहेत. अशी माहिती लाईव्ह लॉ च्या ट्विटर हॅँडलवर देण्यात आली आहे.


Updated : 20 Jan 2021 3:40 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top