आर्यन खानच्या अटकेवरून त्याची बहीण सुहानाला नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यावर तिने घेतला 'हा' निर्णय...
X
सध्या प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. एका क्रूज पार्टीत तो सामील झाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकरणानंतर शाहरुख खान यांची मुलगी व अटकेत असलेल्या आर्यन खान यांची बहिण सुहान खान यांना समाजमाध्यमांवर नेटकर्यांच्या ट्रोलिंगचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागतोय.

सुहाना ही सोशल मीडियावरती नेहमीच ॲक्टिव असते. ती तिचे वेगळे-वेगळे फोटो समाजमाध्यमांवर शेअर करत असते. मात्र नेटकर्यांनी आर्यन खानच्या प्रकरणावरून तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केल्यानंतर तिने आपला कमेंट्स सेक्शन बंद केला आहे. आता तिच्या कोणत्याही पोस्टवर कमेंट करता येत नाही.

अमली पदार्थ विरोधी पथकाने क्रूझवर टाकलेल्या धाडीत आर्यन खान आढळून आला होता. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा बॉलिवूड आणि ड्रस हा विषय चर्चेत आले आहे. आर्यन खान सह सात आरोपींवर सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. काल झालेल्या सुनावणीत न्यायालयाने आर्यन सहज सात जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आज त्यांच्या जामिनासाठी अर्ज केला जाऊ शकतो. व त्यावर आज न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.