गणेश नाईकांच्या अटकेचे आदेश पण नाईक संपर्क क्षेत्राच्या बाहेर?
गणेश नाईकांच्या अटकेसाठी पोलिस तयार पण नाईक सध्या कुठेच सापडत नाहियेत.
X
आमदार गणेश नाईक यांच्याविरूध्द काही दिवसांपूर्वी सीबीडी बेलापूर तसेच नेरूळ पोलिस ठाण्यांमध्ये लैंगिक शोषण तसेच फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या महिलेने महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली असता महिला आयोगाने गणेश नाईकांच्या अटकेचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्यांना आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते
पोलिसांनी महिला आयोगाच्या आदेशानुसार आमदार नाईक यांच्या कोपरखैरणे इथल्या घरी, कार्यालयात तसेच मुरबाड येथील फार्म हाऊसवर पोलिस कारवाईसाठी पोहोचले परंतू गणेश नाईक त्यांना तिथे सापडलेच नाहीत. गणेश नाइक कुठे आहेत असा प्रश्न आता प्रत्येकाल पडू लागला आहे.
या प्रकरणात गणेश नाईकांना अटक होणार
मागील सत्तावीस वर्षापासून आपण गणेश नाईक यांच्यासोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये असून आपल्याला गणेश नाईक यांच्यापासून एक पंधरा वर्षाचा मुलगा असल्याचे त्यांनी सांगितले होते.मात्र मागील तीन वर्षापासून आपल्याकडे गणेश नाईक हे पूर्णपणे दुर्लक्ष करत असून आपल्या मुलाला गणेश नाईक यांचे नाव मिळावे, म्हणून आपल्या गणेश नाईक यांना विचारणा केली असता त्यांनी स्वतः जवळ असलेले पिस्तूल दाखवून मला जीवे मारण्याची धमकी दिली.अशा प्रकारची तक्रार त्यांनी नेरूळ पोलीस स्टेशनला दिली होती.
तसेच गणेश नाईक १९९३ पासून माझ्या घरी रात्री अपरात्री येऊन माझ्या इच्छेविरुद्ध लैंगिक शोषण करत असल्याचे गंभीर आरोप या महिलेने केले होते.या दोन्ही प्रकरणाची नवी मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेत मागील दोन दिवसांपूर्वी गणेश नाईक यांच्या फसवणुकीचा गुन्हा सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला तर त्यांच्या विरोधामध्ये नेरूळ पोलीस ठाण्यातदेखील लैंगिक शोषण अर्थात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला आयोगाने देखील या प्रकरणाची सखोल चौकशी करत त्यांच्या अटकेचे आदेश दिले आहेत.