Home > News > आकांक्षा प्रकाशनची राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धा

आकांक्षा प्रकाशनची राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धा

आकांक्षा प्रकाशनची राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धा
X

आकांक्षा प्रकाशन च्या वतीने राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. आकांक्षा प्रकाशन गेली अनेक वर्ष साहित्य क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्रातही वेगवेगळे कार्यक्रम राबवत असते. वाचक लेखक मेळावे, साहित्य संमेलन, बालसाहित्य संमेलन, कवी संमेलन, लीहित्यांची कार्यशाळा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन आम्ही नेहमी करीत असतो.

अलीकडच्या काळात आम्ही कथास्पर्धा सुरू केलेली आहे. अलीकडे चांगल्या कथा मराठीत वाचनात येत नाही, कथा लोप पावत चालली आहे की काय अशा प्रकारचे प्रश्न वारंवार चर्चेला येतात. त्यातूनच सुरू झालेला हा उपक्रम. यातून चांगले कथालेखक गवसू शकतात. जे लिहितात त्यांना वाव मिळावा आणि जे लिहीत नाहीत, त्यांना या निमित्ताने प्रोत्साहन मिळावे या हेतूने ही कथा स्पर्धा आकांक्षा प्रकाशन आयोजित करीत असते. राज्यभरातून वीस वर्षांवरील कुणीही या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. कथा मराठीतच असावी. तसेच अप्रकाशित आणि स्वलिखितच असावी. विषयाचे बंधन नाही मात्र ती अडीच ते तीन हजार शब्द मर्यादेत असावी. वऱ्हाडी, ग्रामीण, बोलीभाषा, प्रमाणभाषा कोणत्याही मराठी भाषेत लिहिलेली चालेल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. प्रथम पुरस्कार अडीच हजार, द्वितीय पुरस्कार दोन हजार, तृतीय पुरस्कार एक हजार तसेच ग्रंथ भेट,सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असेल.

कथा 30 मे पर्यंत खालील मेल आयडीवर *केवळ युनिकोड मध्ये किंवा PDF पाठवावी असे आकांक्षा प्रकाशनच्या संचालक अरुणा सबाने यांनी कळविले आहे.

मेल आयडी: arunasabane123@gmail.com

अधिक माहितीसाठी स्पर्धेच्या प्रमुख धनश्री पाटील 99214 07479 यांच्याशी संपर्क करावा.

Updated : 28 March 2025 9:58 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top