कोरोनाकाळात उपासमारीमुळे दर मिनिटाला 11 लोकांचा मृत्यू
X
कोरोनाच्या महाभयंकर संकटाने सर्वसामन्यांच जगण अवघड झालं आहे, त्यात अनेकांचे नोकऱ्या गेल्यात तर काहींची व्यवसाय बंद झाले, अशात काही घटक असे आहेत ज्यांना दोन वेळेची जेवणाची सोय सुद्धा करत येत नसल्याने उपासमारीमुळे जीव गमवावा लागत आहे. आणि ही परिस्थती जगभरात आहे. गरीबीच्या आकड्यांचं विश्लेषण करणारी आंतरराष्ट्रीय संघटना ऑक्सफॅमचं म्हणणं आहे, की दर मिनिटाला उपासमारीमुळे 11 लोकांचा मृत्यू होतोय.
कोरोनाचा परिणाम संपूर्ण घटकांवर झाला आहे, मात्र, जे लोक आधीच गरीबी आणि दोन वेळच्या अन्नासाठी संघर्ष करत होते, त्यांच्यावर याचा सर्वाधिक परिणाम झाला असल्याचं आकडेवारीतून समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय संघटना ऑक्सफॅमच्या अहवालातून अशीच काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑक्सफॅमच्या दिलेल्या आकडेवारीनुसार दर मिनिटाला उपासमारीमुळे 11 लोकांचा मृत्यू होतो. तसेच जगभरात या परिस्थितीचा सामना करणाऱ्या लोकांच्या संख्येत मागील वर्षीच्या तुलनेत सहा पटीनं वाढ झाली असल्याचा दावा सुद्धा ऑक्सफॅमने केला आहे... 'ऑक्सफॅम' अहवालात काय म्हंटले आहे...
ऑक्सफॅमच्या दिलेल्या आकडेवारीनुसार दर मिनिटाला उपासमारीमुळे 11 लोकांचा मृत्यू होतो.
जगभरात या परिस्थितीचा सामना करणाऱ्या लोकांच्या संख्येत मागील वर्षीच्या तुलनेत सहा पटीनं वाढ झाली आहे.
जगभरात 15.5 कोटी लोक असे आहेत ज्यांच्याकडे अन्न सुरक्षा नाही आणि काहींची परिस्थिती तर यापेक्षाही वाईट आहे
कोरोनामुळे तब्बल 5 लाख 20 हजार लोकांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे
ऑक्सफॅमच्या रिपोर्ट नुसार अफगानिस्तान, इथोपिया, दक्षिण सूदान, सीरिया आणि यमन यांच्यासह काही देशांना सर्वाधिक खराब अवस्था असलेले उपासमारीचे हॉटस्पॉट म्हटलं गेलं आहे. त्यामुळे ही परिस्थती चिंताजनक असून, जर तिसरी लाट आलीच तर परिस्थती आणखीनच गंभीर बनेल यात काही शंका नाही.