Home > News > लवकरच मुंबईतून देशातील पहिली स्लीपर वंदे भारत धावणार...

लवकरच मुंबईतून देशातील पहिली स्लीपर वंदे भारत धावणार...

लवकरच मुंबईतून देशातील पहिली स्लीपर वंदे भारत धावणार...
X

वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात सध्या चार वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. पण लवकरच मुंबईतून देशातील पहिली स्लीपर वंदे भारत धावणार आहे. चेन्नईच्या आयसीएफ फॅक्टरीत वंदेभारचे स्लीपर कोच तयार केले जात आहेत. मुंबई ते दिल्ली या मार्गावर हि रेल्व्हे धावणार असल्याचं म्हंटल जात आहे. मुंबई ते दिल्ली रेल्वेमार्गाने जाण्यासाठी 16 तास लागतात. मात्र ते अंतर कमी करुन 12 तासांवर आणण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं सुद्धा म्हंटल जात आहे. या प्रकल्पाला 2017 ते 18 मध्ये मंजूरी मिळाली होती. यासाठी मुंबई आणि दिल्लीदरम्यान रेल्वे रूळांची मजबूती, पुल दुरुस्त करणे, ओएचई मॉर्डनायजेशन करणे, संपूर्ण रेल्वे रुळांवर कवच प्रणाली स्थापित करणे, रुळांवरुन दोन्हीकडून काम केले जाणार आहे. रुळांवरुन रेल्वे 160 किमी ताशी वेगाने धावणार आहे.. बाकी हाराष्ट्रात सध्या ज्या चार वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत त्यातून तुम्ही प्रवास केला आहे का? केला असेल तर तुमचे अनुभव कसे होते नक्की कॉमेंट मध्ये सांगा...

Updated : 22 July 2023 1:44 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top